खादी ग्रामोद्योग विभागाच्या मधुमित्र आणि मधुसखी पुरस्कारसाठी अर्ज मागविले

 


 

छत्रपती संभाजीनगर, दि.२२ (जिमाका)-महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्यावतीने २०२६ साठी मधुमित्र व मधुसखी पुरस्कारासाठी नामांकने मागविण्यात येत आहेत. तीन वर्षांपासून ही पुरस्कार योजना सुरु झाली असून मधमाशीपालन व्यवसायास गती मिळावी व मधपाळांना प्रोत्साहन देण्यासाठी मंडळाने हा उपक्रम सुरु केला आहे.

मधमाशीपालनात अनेक वर्ष काम करणाऱ्या यशस्वी मधपाळांना प्रथम, द्वितीय व तृतीय पुरस्काराने या  योजनेत सन्मानित करण्यात येते. यातील एका पुरस्कार महिला मधपाळासाठी राखीव आहे. प्रथम पुरस्कारसाठी ११०००, द्वितीय रु.७.००० तृतीय पुरस्कार साठी५,००० आहे.

दि.२०मे २०२६ रोजी जागतिक मधमाशी दिनाचे औचित्य साधून जिल्हा पुणे येथे जाहीर समारंभात हे पुरस्कार प्रदान केले जातील या पुरस्काराची लिंक मंडळाच्या www.mskvib.org या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. प्रत्येक जिल्ह्यात खादी मंडळाच्या जिल्हा कार्यालयात नामांकन अर्ज मिळू शकतील.

इच्छुकांनी आपले नामांकन दि. ०४ मे २०२६ पूर्वी मंडळाच्या जिल्हा कार्यालयात पाठवावे

अधिक माहितीसाठी संपर्क जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी जिल्हा कार्यालय,संपर्क .क्र ०२४०-२३३४५६९

येथे संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, छत्रपती संभाजीनगर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

00000


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा