स्थानिक प्राधिकारी विधान परिषद द्विवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर

छत्रपती संभाजीनगर, दि.१८(जिमाका)- औरंगाबाद- जालना स्थानिक प्राधिकारी विधान परिषद द्विवार्षिक निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून गुरुवार दि.१८ जून रोजी मतदान होणार आहे,अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती सविता चौधर यांनी दिली आहे.

औरंगाबाद- जालना स्थानिक प्राधिकारी विधानपरिषद द्विवार्षिक निवडणुकीचा जाहीर झालेला कार्यक्रम याप्रमाणे-

निवडणूक अधिसुचना प्रसिद्ध करण्याचा दिनांक सोमवार दि.२५ मे २०२६,

नामनिर्देशन पत्रे सादर करण्याचा अखेरचा दिनांक सोमवार दि.१ जून २०२६,

नामनिर्देशन पत्राची छाननी मंगळवार दि.२ जून २०२६,

उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक गुरुवार दि.४ जून २०२६,

मतदानाचा दिनांक गुरुवार दि.१८ जून २०२६,

मतदानाची वेळ सकाळी ८ ते सायं.४ वा. पर्यंत. 

मतमोजणीचा दिनांक सोमवार दि.२२ जून २०२६.

निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचा दिनांक गुरुवार दि.२५ जून २०२६.

या कार्यक्रमाची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी,असे आवाहन जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर यांनी केले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा