औषध विक्रेत्यांचा आज (दि.२०)संप; रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी नियंत्रण कक्ष स्थापन

 


छत्रपती संभाजीनगर, दि.१९(जिमाका)- औषध विक्रेत्यांच्या संघटनेने बुधवार दि.२० रोजी एक दिवसीय बंद पुकारला असून या कालावधीत रुग्णांची गैरसोय टाळावी यासाठी छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये जिल्हानिहाय नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. बंद कालावधीत गरजु रुग्णांना औषधे उपलब्ध न झाल्यास तसेच अत्यावश्यक औषधांची गरज भासल्यास त्यांनी आपापल्या जिल्ह्यात नियुक्त अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा.

.         छत्रपती संभाजीनगर- सहायक आयुक्त (औषधे) शा. ना. साळे-8983290162, सहायक आयुक्त (औषधे)वि. वि. नांगरे-7387561343, औषध निरीक्षक म. भा. पैठणे-9021899018.

.         जालना- सहायक आयुक्त (औषधे)जी.द.जाधव-8379016068,

.         परभणी- सहायक आयुक्त (औषधे) ना.सी.भालेराव-9405783636

.        हिंगोली- सहायक आयुक्त (औषधे) ना.सी.भालेराव-9405783636

.         बीड- सहायक आयुक्त (औषधे) मा.ज.निमसे-9423749616

.         नांदेड- अ.तु.राठोड-8369027068

.        धाराशिव-सहायक आयुक्त (औषधे) ब.दा.मरेवाड-8275175232, औषध निरीक्षक श्रीमती.स्वा.क.कुपकर-8830801806

.         लातुर- सहायक आयुक्त (औषधे) ब.दा.मरेवाड-8275175232

ज्या रुग्णांना नियमीत औषधांची आवश्यकता आहे अशा रुग्णांनी/नातेवाईकांनी बंद कालावधीत त्यांची गैरसोय टाळण्याकरीता औषधे आगाऊ खरेदी करुन ठेवावीत. आवश्यकता भासल्यास जिल्हानिहाय नियंत्रण कक्षात नेमलेल्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा,असे आवाहन सहायक आयुक्त (औषधे) वि.वि. नांगरे यांनी केले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा