बेवारस वाहनांच्या मालकांनी कागदपत्रांसह हर्सुल पोलीस ठाण्यात संपर्क साधावा
छत्रपती संभाजीनगर,दि.२५-(जिमाका)शहर पोलीस दलांतर्गत येणाऱ्या हर्सुल पोलीस ठाण्याच्या
हद्दीत विविध कारवायांमध्ये हस्तगत करण्यात आलेली आणि बेवारस स्थितीत मिळून आलेली दुचाकी
व चारचाकी वाहने पोलीस ठाण्याच्या आवारात जमा आहेत. या जप्त करण्यात आलेल्या बेवारस
वाहनांची कायदेशीर रितीने विल्हेवाट करण्यासाठी
असल्याने, त्यांच्या मूळ मालकांचा शोध सुरू केला आहे.
ज्या कोणत्याही व्यक्तीचा या वाहनांवर
मालकी हक्क असेल, त्यांनी ०७ (सात) दिवसांच्या
आत हर्सुल पोलीस स्टेशन येथे स्वतः हजर राहावे. वाहनांची मूळ अधिकृत कागदपत्रे सादर
करून नागरिकांनी आपला मालकी हक्क सिद्ध करावा, असे आवाहन पोलीस निरीक्षकांनी केले आहे.
दिलेल्या ७ दिवसांच्या मुदतीत जर जप्त करण्यात आलेल्या
या वाहनांवर कोणीही आपला कायदेशीर मालकी हक्क प्रस्थापित केला नाही, तर सदर सर्व बेवारस
मालमत्ता शासकीय नियमांनुसार विल्हेवाट किंवा लिलाव प्रक्रियेत काढली जाईल. त्यानंतर
कोणत्याही दाव्याचा विचार केला जाणार नाही. तक्रारदार नागरिकांना पडताळणीचे आवाहन
ज्या नागरिकांची वाहने हर्सुल किंवा
परिसरातून चोरीला गेली आहेत अथवा हरवली आहेत, त्यांनी छत्रपती संभाजीनगर पोलीस विभागाच्या
Psharsool.abad@mahapolice.gov.inया अधिकृत संकेतस्थळावर/ईमेलवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या
वाहनांच्या यादीची पडताळणी करून घ्यावी.
जप्त केलेल्या वाहनाच्या यादीत एकूण ३० हून अधिक
वाहनांचा समावेश आहे. त्यापैकी काही पुढीलप्रमाणे आहेत.
होंडा पॅशन (लाल रंग) MH-२०-CN-४४३२,
हिरो होंडा स्प्लेंडर प्लस (निळे पट्टे) MH-२३-M-३६१९,
पॅशन प्रो (लाल रंग) नंबर नाही, हिरो होंडा प्लस
(काळा रंग) MH-२०-AW-२२६९, बजाज प्लॅटिना काळा
रंग MH-२०-BC-८४१० , बजाज डिस्कव्हर (काळसर, लाल पट्टे) MH-१४-DW-९०६५,
लाल रंगाची बजाज XCD MH-21-W-६१०९
हिरवट रंगाची ह्युंदाई कार MH-०४-AS-५८५०,
पांढऱ्या रंगाची लोडिंग रिक्षा MH २३',३०४७, यामाहा,काळ्या
रंगाची MH २८,p-१३७५,बजाज कावासाकी कॅलिबर, MH १४,N-१८४६, बजाज चेतक स्कूटर, MVF-५१३७,
टीव्हीएस स्टार सिटी मोसा, MH -२०.BE-६४४२, पॅशन प्रो- MH १२,JV-६२०२,यासह अन्य वाहन हर्सूल पोलिस ठाण्यात निर्गती साठी ठेवण्यात आली
आहे.मालकांनी हर्सूल पोलिस स्टेशनमध्ये संपर्क साधावा असे आवाहन पोलीस निरीक्षक, हर्सूल
यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
00000
Comments
Post a Comment