औरंगाबाद-जालना स्थानिक प्राधिकारी निवडणूक; जिल्ह्यात मनाई आदेश जारी
छत्रपती संभाजीनगर, दि.२६,(जिमाका)औरंगाबाद-जालना स्थानिक प्राधिकारी
निवडणूक सुरळीत, निष्पक्ष, निर्भय आणि पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी विनय गौडा जी.सी.
यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १८ मे २०२६
ते २५ जून २०२६ रोजी मतदान प्रक्रिया संपेपर्यंत मनाई आदेश जारी केले आहेत.
या आदेशानुसार, निवडणूक आयोगाने
प्राधिकृत केलेले अधिकारी-कर्मचारी आणि मतदानासाठी रांगेत उभे असलेले मतदार वगळता,
जिल्ह्यात पाच किंवा पाच पेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास सक्त मनाई करण्यात आली
आहे. मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसरात 'हे' नियम पाळावे लागणार असून
निवडणुकीची गोपनीयता आणि सुरक्षितता
राखण्यासाठी मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसरात कोणत्याही व्यक्तीला, तसेच मतदान केंद्रातील
मतदान प्रतिनिधींना मोबाईल फोन, कॉर्डलेस फोन, मेगा फोन, मायक्रोफोन किंवा वायरलेस
सेट वापरण्यास आणि फोटो काढण्यास सक्त मनाई असेल.
बंदोबस्तासाठी नेमलेले पोलीस अधिकारी व कर्मचारी
वगळून इतर कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही प्रकारची शस्त्रे बाळगता येणार नाहीत. तसेच,
केवळ परवानगी दिलेल्या वाहनांनाच या परिसरात प्रवेश मिळेल. मतदान केंद्र परिसरात निवडणूक
विषयक प्रचार करणे, मतदारांना धमकावणे किंवा ठराविक उमेदवारालाच मतदान करण्यासाठी दबाव
टाकण्यास पूर्ण मनाई आहे.
ज्वलनशील पदार्थ, स्फोटक साहित्य किंवा मनुष्य आणि
मतदान यंत्राला (EVM) हानी पोहोचवू शकेल अशी कोणतीही वस्तू नेण्यावर बंदी घालण्यात
आली आहे.
या आदेशाचे भंग केल्यास ती व्यक्ती
भारतीय न्याय संहिता कलम २२३ नुसार शिक्षेस पात्र राहील असे आदेशात नमूद केले आहे.
तसेच भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम १६३ अन्वये कडक कायदेशीर कारवाई केली जाईल
आणि ती व्यक्ती शिक्षेस पात्र राहील असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
00000
Comments
Post a Comment