. विशेष सखोल पुनरिक्षण' कार्यक्रम; जिल्ह्यातील मतदारांची होणार पडताळणी ​ विशेष सखोल पुनरिक्षण' कार्यक्रम; जिल्ह्यातील मतदारांची होणार पडताळणी

 


            छत्रपती संभाजीनगर,दि;१५(जिमाका)-भारत निवडणूक आयोगाने देशातील १६ राज्ये आणि ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) मोहिमेचा तिसरा टप्पा जाहीर केला आहे. या मोहिमेत महाराष्ट्राचाही समावेश करण्यात आला असून, राज्यातील सुमारे ९ कोटी ८६ लाख ४४ हजार ४१३ मतदारांच्या नोंदींची प्रत्यक्ष पडताळणी केली जाणार आहे. ही मोहीम जून ते ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राबवली जाणार आहे.

            निवडणूक आयोगाकडून नियुक्त केलेले मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) प्रत्येक मतदाराच्या घरी जाऊन त्यांच्या तपशिलाची खातरजमा करणार आहेत. या संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता राहावी यासाठी राजकीय पक्षांतर्फे नेमलेले बूथ लेव्हल एजंट्स (BLA) या अधिकाऱ्यांना सहकार्य करणार आहेत.

            सध्या सुरू असलेल्या जनगणनेच्या कामात व्यस्त असलेल्या क्षेत्रीय यंत्रणेचा (Field Staff) विचार करून या तिसऱ्या टप्प्याचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले, जेणेकरून दोन्ही कामांमध्ये सुसूत्रता राखता येईल.

महाराष्ट्रासाठीचे महत्त्वाचे वेळापत्रकमध्ये बीएलओ प्रशिक्षण हे २० ते २९ जून दरम्यान देण्यात येणार आहे. ३० जून ते २९ जुलै २०२६या कालावधीत घरोघरी जाऊन प्रत्यक्ष भेटी देण्यात येणार आहेत.मसुदा मतदार यादी प्रसिद्धी ही ५ ऑगस्ट २०२६ रोजी होईल.यावर दावे व हरकती नोंदवणे साठी ५ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर २०२६ दरम्यान दाखल करता येतील.

अंतिम मतदार यादी प्रसिद्धीदिनांक ७ ऑक्टोबर २०२६ रोजी जाहीर करण्यात येणार आहे.

निवडणूक आयोगाने सर्व राजकीय पक्षांना प्रत्येक मतदान केंद्रावर आपले एजंट (BLA) नियुक्त करण्याचे आवाहन केले आहे. राजकीय पक्षांच्या सहभागामुळे मतदार यादीतील दुबार नावे वगळणे, मृत व्यक्तींची नावे काढणे आणि नवीन पात्र मतदारांची नोंदणी करणे ही प्रक्रिया अधिक अचूक, पारदर्शक आणि दोषरहित होण्यास  मदत होणार आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात देखील विशेष सखोल पुनरिक्षण मोहीम (SIR )ही प्रक्रिया राबवली जाणार असल्याचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी सविता चौधर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा