पत्रपरिषद:स्थानिक प्राधिकारी विधान परिषद द्विवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर; निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज- अपर जिल्हाधिकारी अडकुणे



छत्रपती संभाजीनगर
, दि.२१ (जिमाका)- औरंगाबाद- जालना स्थानिक प्राधिकारी विधान परिषद द्विवार्षिक निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून गुरुवार दि.१८ जून रोजी मतदान होणार आहे. निवडणुकीसाठी प्रशासनाची तयारी करण्यात येत असून प्रशासन सज्ज आहे,अशी माहिती अपर जिल्हाधिकारी संभाजीराव अडकुणे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

औरंगाबाद- जालना स्थानिक प्राधिकारी विधानपरिषद द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून यासंदर्भात माहिती देण्यासाठी आज जिल्हाप्रशासनाने पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. या पत्रकार परिषदेस निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सविता चौधर उपस्थित होते.

पत्रकार परिषदेत प्रथम निवडणूक कार्यक्रमाची माहिती देण्यात आली. त्यानुसार निवडणूक कार्यक्रम याप्रमाणे-

निवडणूक अधिसुचना प्रसिद्ध करण्याचा दिनांक सोमवार दि.२५ मे २०२६,

नामनिर्देशन पत्रे सादर करण्याचा अखेरचा दिनांक सोमवार दि.१ जून २०२६,

नामनिर्देशन पत्राची छाननी मंगळवार दि.२ जून २०२६,

उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक गुरुवार दि.४ जून २०२६,

मतदानाचा दिनांक गुरुवार दि.१८ जून २०२६,

मतदानाची वेळ सकाळी ८ ते सायं.४ वा. पर्यंत. 

मतमोजणीचा दिनांक सोमवार दि.२२ जून २०२६.

निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचा दिनांक गुरुवार दि.२५ जून २०२६.

अपर जिल्हाधिकारी अडकुणे यांनी सांगितले की, या निवडणूकीसाठी जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर व जिल्हाधिकारी जालना हे निवडणूक निर्णय अधिकारी असतील तर निवासी उपजिल्हाधिकारी हे सहा. निवडणूक निर्णय अधिकारी असतील. यानिवडणुकीसाठी स्थानिक स्वराज्य संस्थेवर निवडून आलेले व नियुक्त सभासद  हे मतदान करु शकतील. त्यात महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत सदस्य, जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सभापती यांचा समावेश असेल. याबाबत संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, मनपा आयुक्त, मुख्याधिकारी यांच्याकडून मतदारांची यादी प्राप्त होईल. ही यादी अंतिम झाल्यावर त्यावर हरकती मागविण्यात येतील. त्यानंतर मतदार यादी अंतिम करण्यात येईल. निवडणुक आचार संहिता लागू झालेली असून आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सुचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत,असेही त्यांनी सांगितले.

००००००


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा