जिल्हानियोजन समितीची शुक्रवारी (दि.१५) बैठक
छत्रपती संभाजीनगर,
दि.१२(जिमाका)-
जिल्हा नियोजन समितीची बैठक येत्या शुक्रवारी दि.१५ रोजी दुपारी १२ वा. जिल्हा नियोजन
समिती सभागृह,जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजीत करण्यात आली आहे. राज्याचे सामाजिक
न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या अध्यक्षतेखाली या बैठकीचे
आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा वार्षिक योजना(सर्वसाधारण), अनुसूचित जाती उपयोजना,
आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजना अंतर्गत सन २०२५-२६ मार्च अखेर झालेल्या खर्चास मान्यता
देणे,सन २०२६-२७ करीता एप्रिल २०२६ अखेर झालेल्या खर्चाचा आढावा घेणे इ. विषयांवर या
सभेत कामकाज होणार आहे, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिव विनय
गौडा जी.सी. यांनी कळविले आहे.
०००००
Comments
Post a Comment