नोंदणी व मुद्रांक विभागाच्या अभिलेख 'डिजिटायझेशन'साठी जागा मालकांनी निविदा सादर कराव्यात

 

 


  छत्रपती संभाजीनगर,दि. 14- राज्य शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभागांतर्गत येणाऱ्या राज्यातील सर्व नोंदणी कार्यालयांमधील बारनिशी, छापील व विवाह अभिलेखांचे संगणकीकरण (Digitization) करून ते सुरक्षित जतन करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी नियुक्त करण्यात आलेल्या मे. सर्वस्य मर्चेंडायझर्स प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेला छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका क्षेत्रात भाडेतत्त्वावर जागेची आवश्यकता आहे. एकूण ४हजार ७०० चौरस फूट  जागा असणाऱ्या मालक  यांनी संपर्क साधण्याच्या आवाहन करण्यात आले आहे.

अभिलेखांची सुरक्षित हाताळणी, स्कॅनिंग, वर्गीकरण आणि जतन करण्यासाठी सर्व भौतिक सुविधांनी युक्त अशा एकूण ४,७०० चौ. फूट जागेची गरज आहे.  कामकाजासाठी ३,००० ते ३,५०० चौ. फूट आणि साठवणुकीसाठी (Storage) जागा: १,२०० चौ. फूट. जागा आवश्यक आहे. सदरील जागा ही छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका क्षेत्रात  उपलब्ध  असावी.  जागा मालकांनी आपल्या निविदा (Tenders) आवश्यक कागदपत्रांसह  सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालय, नोंदणी मुद्रांक इमारत, पहिला मजला, छत्रपती संभाजीनगर. येथे  दिनांक २०  मे २०२६ रोजी दुपारी ०३:०० वाजेपर्यंत सादर कराव्यात.

शासकीय अभिलेखांच्या संरक्षणाचे आणि डिजिटायझेशनचे हे काम अत्यंत महत्त्वाचे असल्याने, निकषांची पूर्तता करणाऱ्या जागा मालकांनी विहित मुदतीत संपर्क साधण्याचे आवाहन नोंदणी उपमहानिरीक्षक व मुद्रांक उपनियंत्रक विजय भालेराव यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा