राष्ट्रीय लोकअदालत शनिवारी (दि. ९)
छत्रपती संभाजीनगर,
दि. ७(जिमाका)-
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली तसेच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण,
मुंबई यांच्या आदेशान्वये जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या वतीने शनिवार दि. ९ रोजी
राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयांसह जिल्हा व सत्र
न्यायालयात ही लोकअदालत पार पडणार आहे.
दुरावलेले संबंध, प्रलंबित तसेच
दाखलपूर्व प्रकरणे सामंजस्याने मिटविण्यासाठी या लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.
या लोकअदालतीमध्ये तडजोडपात्र दिवाणी, फौजदारी, बँक वसुली, कामगार वाद, वीज व पाणी
देयक, पैसे वसुली, भूसंपादन, महसूल, कामगार व औद्योगिक वाद तसेच वैवाहिक वादासंदर्भातील
विविध प्रकरणांचा समावेश करण्यात आला आहे.
प्रकरणे लोकअदालतीमध्ये ठेवण्यासाठी
संबंधितांनी आपली प्रकरणे ज्या न्यायालयात प्रलंबित आहेत त्या न्यायालयात अर्ज करावा.
दाखलपूर्व प्रकरणांसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण किंवा तालुका विधी सेवा समितीकडे
अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी जिल्हा विधी सेवा
प्राधिकरण येथे ८५९१९०३६२० या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये जास्तीत
जास्त प्रकरणे तडजोडीने निकाली काढून जिल्हा विधी सेवा प्राधिकरणास सहकार्य करावे,
असे आवाहन प्रमुख जिल्हा न्यायाधीश गिरीश रा. अग्रवाल तसेच सचिव श्रीमती वैशाली पी.
फडणीस यांनी केले आहे.
00000
Comments
Post a Comment