लेखाविषयक प्रशिक्षण
छत्रपती
संभाजीनगर,दि.८(जिमाका)- विभागाच्या लेखा व कोषागारे संचालनालयांतर्गत विभागीय सहसंचालकामार्फत
लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा लिपीक,
पर्यवेक्षकीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्र्शिक्षण २० एप्रिल ते १ जुलै
या कालावधीत होत असून विभागातील शासकीय कार्यालयांनी आपल्या लेखा कर्मचाऱ्यांना या
प्रशिक्षणासाठी पाठवावे असे आवाहन लेखा व कोषागारे विभागाच्या सह संचालक रेहाना अ काझी
यांनी केले आहे. या ५० दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमात लेखा, वित्त व शासनाच्या विविध संगणक प्रणालींचा
समावेश असून त्या विषयाची निश्चित केलेला तपशिलवार अभ्यासक्रम विभागातील सर्व कोषागार
अधिकारी कार्यालयात उपलब्ध आहे. या प्रशिक्षणासाठी इच्छुक शासकीय कर्मचाऱ्यांना प्रवेश
देण्यात येईल.प्रशिक्षणासाठी शासकीय कर्मचाऱ्यांचे आवेदन पत्र व कार्यालय प्रमुखाचे
शिफारस पत्र पाठवावे. तसेच गट क इच्छुक कर्मचारी व नवनियुक्त कर्मचारी यांनाही अभ्यासक्रमासाठी
प्रवेश घेता येईल. विशिष्ट मोड्युलसाठीही प्रवेश घेण्याची अनुमती देता येईल. तरी छत्रपती
संभाजीनगर विभागातील सर्व शासकीय कार्यालयीन प्रमुखांना त्यांच्याकडील गट क तसेच लिपीक
वर्गीय कर्मचारी यांना प्रशिक्षणासाठी पाठवावे
असे आवाहन सहसंचालक रेहाना काझी यांनी केले आहे.
०००००
Comments
Post a Comment