जमीन मोजणीची प्रकरणे निकाली काढण्यासाठी परवानाधारक ३० भूमापकांची नियुक्ती करण्यास मान्यता

 

 


छत्रपती संभाजीनगर, दि.१२(जिमाका)- भूमि अभिलेख विभागामार्फत करावयाच्या जमीन मोजणीसाठी आता अभिकरणामार्फत ३० परवानाधारक भूमापकांची नियुक्ती करण्यास मान्यता मिळाली असून यासंदर्भातील निविदा सुचना  https://mahatenders.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध झाली आहे,असे जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख डॉ.विजय वीर यांनी कळविले आहे. मर्यादीत मनुष्यबळामुळे मोजणीची प्रकरणे प्रलंबित राहू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून अभिकरणामार्फत ३० परवानाधारक भूमापकांची निवड करण्यात येणार आहे,असेही डॉ. वीर यांनी कळविले आहे. दोन वर्षाच्या कालावधीसाठी ही नियुक्ती असेल असेही यानिविदेत स्पष्ट करण्यात आले आहे. या निविदा ई-निविदा पद्धतीने दि.१९ मे पर्यंत मागविण्यात आल्या आहेत. दि.२१ रोजी या निविदा उघडण्यात येणार आहेत. निविदेच्या इतर अटी व शर्ती संकेतस्थळावर पाहता येतील.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा