जिल्ह्यात 'नशामुक्त भारत अभियान' जाणीव जागृतीसाठी तरुणांनी सक्रिय सहभाग घ्यावा

 


 

छत्रपती संभाजीनगर, दि.१५,(जिमाका)- तरुणाईला अंमली पदार्थांच्या विळख्यातून दूर ठेवण्यासाठी जिल्ह्यात आजपासून दि. १५ मे ते ३० जून २०२६ या कालावधीत 'नशामुक्त भारत अभियान' विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासन, समाज कल्याण विभाग आणि जय विश्वकर्मा सर्वोदय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने या व्यापक मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.

या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये, नर्सिंग स्कूल, आयटीआय आणि कोचिंग क्लासेसमध्ये जनजागृती केली जाईल. यामध्ये प्रामुख्याने

 जनजागृती रॅली , चर्चासत्रे,सामूहिक नशामुक्ती प्रतिज्ञा ,निबंध व चित्रकला स्पर्धा,कलापथक आणि पथनाट्ये,विशेष व्याख्याने या द्वारे जाणीव जागृती करण्यात करण्यात येणार आहे.

मोहिमेत जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी बाबासाहेब अरवत आणि समितीचे सदस्य विलास चंदने यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा