जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. आज (दि.१६) आकाशवाणीवर; जनगणना याविषयावर देणार माहिती
छत्रपती संभाजीनगर, दि.१५(जिमाका)-
जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. शनिवार दि.१६ रोजी सकाळी ८ वा. ४० मि. नी. आकाशवाणी
छत्रपती संभाजीनगर केंद्रावर ‘जनगणना’ या विषयावर एका मुलाखतीद्वारे माहिती देणार आहेत.
त्यांच्याशी याविषयावर जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने यांनी बातचीत केली
आहे.
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरुन ‘राष्ट्रीय जनगणना व त्यासंबंधित प्रक्रिया’, याविषयी
जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांची जिल्हा माहिती अधिकारी श्री.मिलिंद दुसाने यांनी
घेतलेली मुलाखत शनिवार दि.१६ रोजी सकाळी ८ वा. ४० मि. नी प्रसारीत होणार आहे. एफ.एम.
101.7 Mhz या वाहिनीवर ही मुलाखत ऐकता येईल
आणि News on AIR ॲप वर ही मुलाखत देशाच्या कोणत्याही भागात ऐकता येणार आहे.
जनगणना, प्रक्रिया, जिल्ह्यातील तयारी, लोकांचे शंकानिरसन अशा
विविध मुद्यांवर त्यांनी या मुलाखतीतून जनगणना या विषयाच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकला
आहे. ही मुलाखत श्रोत्यांनी आवर्जून ऐकावी असे आवाहन कार्यक्रम अधिकारी सुजीत बनसोडे
यांनी केले आहे.
००००००
Comments
Post a Comment