साईनाथ मोरे या बेपत्ता व्यक्तीचा शोध; माहिती कळविण्याचे पोलीस प्रशासनाचे आवाहन
छत्रपती संभाजीनगर,दि,५.(जिमाका)- न्यु पंजाब हॉटेल रेल्वेस्टेशन
सुरक्षा बिल्डिंग नं .०४ रुम नं.५०८ शास्त्री नगर वासी नाका चेंबूर मुंबई येथे राहणारा
५० वर्षीय इसम कोणास काहीही न सांगता निघून गेली आहे. याबाबत वेदांतनगर पोलिसांत मिसिंग
नोंद करण्यात आली आहे. याबाबत तक्रारदार अभिषेक साईनाथ मोरे,राहणार सुरक्षा बिल्डिंग
नं .४ रुम नं.५०८ शास्त्री नगर वासी नाका चेंबूर मुंबई यांनी दिनांक २८मे २०२६ रोजी वेदांत नगर पो.स्टे ला तक्रार दिली आहे.यात,
त्यांचे वडील साईनाथ विश्वनाथ मोरे (वय ५० वर्ष) धंदा-नोकरी रा.सुरक्षा बिल्डिंग नं ४. रुम नं ५०८ शास्त्री
नगर वासी नाका चेंबूर मुंबई हा घरात कोणास काही न सांगता घरातून निघून गेला
आहे. त्याचा शोध घेतला तो मिळून आला नाही. बेपत्ता इसमाचे वर्णन याप्रमाणे- नाव–साईनाथ
विश्वनाथ मोरे, उंची-५ फुट ३ इंच ,रंग-सावळे,नाक-सरळ,डोळे-काळे,केस-पांढरे, अंगात पोषाख-शर्ट
लाल, पँट निळी, पायात – चप्पल,पायात अपघात झाल्याने गुडघ्यामध्ये रॉड आहे. वरील वर्णनाचा इसम आढळल्यास
वेदांतनगर पोलीस स्टेशनला फोन नं-०२४०-२३५१३३३, येथे हवलदार के.पी गुमरे मोबाईल क्रमांक९८२३४९९२५३ यावर माहिती द्यावी असे आवाहन प्रसिद्धी पत्रकाद्वारे
करण्यात आले .
00000

Comments
Post a Comment