रोजगार मेळाव्यातून तरुणांना मिळाला रोजगार;२०७ उमेदवारांची निवड

 


छत्रपती संभाजीनगर, दि.१७(जिमाका )-शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिकी एवं सुचना प्रौद्योगीकी संस्थान (NIELIT) यांच्या संयुक्त विद्यमाने १६ जून २०२६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरातील पंडीत दीनदयाल उपाध्याय NIELIT केंद्र येथे भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यातून २०७ उमेदवारांची विविध नामांकित कंपन्यांसाठी प्राथमिक निवड करण्यात आली.

मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हा कार्यालयाचे सहायक आयुक्त श्री. राजू वाकुडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की, बदलत्या रोजगार बाजारपेठेच्या गरजा ओळखून तरुणांनी नवनवीन कौशल्ये आत्मसात करणे काळाची गरज आहे. त्यांनी शासनाच्या विविध कौशल्य विकास व उद्योजकता योजनांची माहिती देऊन त्यांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.  कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी श्री. भुजंग रिठे आणि श्री. सुरेश बहुरे यांनीही उमेदवारांना या सुवर्णसंधीचा उपयोग करून स्वतःची प्रगती साधण्याबाबत प्रोत्साहित केले.

  मेळाव्यास ५४७ इच्छुक उमेदवारांनी उपस्थित राहून आपली नोंदणी केली होती. विविध आस्थापनांकडे एकूण ७६६ मुलाखती पार घेण्यात आल्या.मुलाखतीअंती २०७ उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली.

या मेळाव्यात जिल्ह्यातील अनेक नामांकित नियोक्त्यांनी सहभाग घेत उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या आणि आपल्याकडील रिक्तपदांची माहिती दिली. मेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी NIELIT चे  अधिष्ठाता अश्वनी कुमार टिक्कू, प्लेसमेंट अधिकारी सौरभ बनसोड, असिस्टंट प्रोफेसर योगेश शेजवळ तसेच कौशल्य विकास विभागाचे श्री. विरेंद्र चव्हाण, श्री. रामदास फुले, श्री. प्रविण डोंगरदिवे, श्री. शिवप्रसाद चिंचोले, श्री. प्रितम सोनवणे, श्री. अखिलेश इंगळे, श्री. विशाल वाघमारे आणि श्री. आदित्य चोपडे यांनी विशेष सहकार्य केले.

00000

 

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा