विधान परिषद निवडणूक आचारसंहिता अंमलबजावणीसाठी प्रतिबंधात्मक आदेश

 


छत्रपती संभाजीनगर, दि.१(जिमाका)- औरंगाबाद-जालना स्थानिक प्राधिकारी निवडणूक २०२६ चा कार्यक्रम जाहीर झालेला असून निवडणूक आचारसंहिता लागू झाली आहे. आचारसंहिता अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.

ध्वनीक्षेपक  वापरावर निर्बंध

निवडणूक आचारसंहिता कालावधीत पोलीस अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय ध्वनीक्षेपकाचा वापर करता येणार नाही. सकाळी ६ ते रात्री १० वा. नंतर कोणत्याही फिरत्या वाहनावर वा कोणत्याही क्षेत्रात ध्वनीक्षेपकाचा वापर करता येणार नाही. सर्व राजकीय पक्ष आणि उमेदवार, इतर व्यक्ती यांनी निश्चित ठिकाणी ध्वनीक्षेपकाचा वापर  करावा, त्यासाठी परवानगी घ्यावी व त्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना द्यावी,असे आदेश जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी निर्गमित केले आहेत. हे आदेश दि.२५ जून पर्यंत अंमलात राहतील असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

पोस्टर्स, बॅनर्स लावण्यावर निर्बंध

निवडणूक आचारसंहिता कालावधीत सार्वजनिक इमारती, सार्वजनिक रस्ता इ. ठिकाणी कोणत्याही राजकीय पक्ष, उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी यांनी राजकीय बॅनर्स, पोस्टर्स, कटआऊट्स, पेन्टिंग्ज, होर्डिंग इ. अपघात होईल अशा पद्धतीने लावण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत.याबाबत जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी आदेश निर्गमित केले आहेत.

वाहनांवर घोषवाक्य लिहिणे, झेंडे लावण्यावर निर्बंध

निवडणूक आचारसंहिता कालावधीत सक्षम प्राधिकरणाच्या पूर्वपरवानगीशिवाय ऑटो रिक्षा, टेम्पो, सायकल रिक्षा, सायकल व इतर वाहनांवर राजकीय पक्षाचे बोधचिन्ह, झेंडे वा घोषवाक्य लिहिण्यास इ. निर्बंध घालण्यात आले आहेत. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी निर्गमित केले आहेत. हे आदेश दि.२५ जून पर्यंत अंमलात राहतील असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा