जी.डी.सी.ए. व सी.एच.एम. परीक्षेचे गुणपत्रक,प्रमाणपत्र परीक्षार्थीने हस्तगत करण्याचे आवाहन

 


छत्रपती संभाजीनगर, दि.४(जिमाका)- सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था ,पुणे यांच्यामार्फत दिनांक २३, २४ व २५ मे २०२५ रोजी जी.डी.सी.आणि सी.एच.एम. परीक्षा २०२५ देवगिरी महाविद्यालय येथे ही परीक्षा घेण्यात आली होती.  या परीक्षेचे गुणपत्रक व प्रमाणपत्र जिल्हा उपनिबंधक कार्यालयाला प्राप्त झाले आहेत.

परीक्षार्थींनी आपली गुणपत्रके व प्रमाणपत्रे दिनांक ३० जून २०२६ पर्यंत जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, छत्रपती संभाजीनगर कार्यालयात स्वतः समक्ष हजर राहून हस्तगत करावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.

यासोबतच, ज्या विद्यार्थ्यांनी सन २०२२, २०२३ व २०२४ मधील परीक्षेचे गुणपत्रक व प्रमाणपत्र अद्याप कार्यालयात येऊन नेलेले नाही, अशा सर्व विद्यार्थ्यांनी देखील तात्काळ कार्यालयात समक्ष येऊन आपली प्रमाणपत्रे हस्तगत करावीत, असे जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, छत्रपती संभाजीनगर कार्यालयाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा