कुणबी जात प्रमाणपत्रःनागरिकांना मार्गदर्शनासाठी हेल्पलाईन


छत्रपती संभाजीनगर
, दि.१५(जिमाका)- मराठवाड्यातील मराठा समाजास मराठा कुणबी, कुणबी मराठा, कुणबी जात प्रमाणपत्र देण्याच्या अनुषंगाने निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. तसेच सामाजिक न्याय व विशेष सहाय्य या विभागाच्या शासननिर्णयानुसार हैदराबाद गॅझेटियर मधील नोंदी विचारात घेऊन पात्र व्यक्तिंना मराठा-कुणबी, कुणबी मराठा, कुणबी जात प्रमाणपत्र देण्यासाठी कार्यपद्धती विहित करण्यात आली आहे. याबाबत नागरिकांना येणाऱ्या समस्यांबाबत मदत व मार्गदर्शन व्हावे यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे  ०२४०-२९८८०७७ हा हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करुन देण्यात आला आहे. जिल्ह्यातील पात्र नागरिकांनी संबंधित उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयाकडे  कुणबी प्रमाणपत्रासाठी आवश्यक कागदपत्रासह अर्ज करावे. त्याबाबत काहीही अडचण असल्यास कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी वरील हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

००००० 

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा