पर्यावरण दिनानिमित्त सुखना नदी काठावर वृक्षरोपण

 





 

छत्रपती संभाजीनगर, दि.५(जिमाका)- जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सुखना नदीच्या काठावर आज वृक्षरोपण करण्यात आले. यावेळी भारतीय वंशाच्या अडीच हजारांहून अधिक वृक्षरोपांचे रोपण करण्यात आले. महापौर समीर राजूरकर,आमदार अनुराधा चव्हाण, विभागीय आयुक्त जी श्रीकांत, जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., महानगरपालिका आयुक्त अमोल येडगे, अतिरिक्त आयुक्त कल्पिता पिंपळे, उपआयुक्त नंदकिशोर भोंबे, विकास नवाळे, शहर अभियंता संजय कोंबडे, अपर्णा थेटे, उद्यान अधीक्षक विजय पाटील, मुख्य लेखा अधिकारी संतोष वाहुळे आदी उपस्थित होते. पर्यावरण संवर्धन आणि हरित शहर निर्मितीच्या उद्देशाने आयोजित या उपक्रमात नागरिकांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा