रेल्वे स्टेशन चौक परिसरातील अज्ञात मृत व्यक्तीच्या वारसांचा शोध; ओळख पटविण्यासाठी आवाहन
छत्रपती संभाजीनगर,
दि.४(जिमाका)-रेल्वे
स्टेशन चौक आऊट गेट सिग्नल येथील रोड डिव्हायडरवर बेशुद्ध अवस्थेत आढळलेल्या एका अनोळखी
व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. याप्रकरणी वेदांत नगर पोलीस ठाण्यात अकस्मात
मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलिसांनी या अज्ञात मृत व्यक्तीच्या वारसांचा शोध
घेण्यासाठी नागरिकांना माहिती देण्याचे आवाहन केले आहे.
पोलिसांनी दिलेल्या
माहितीनुसार, दि.
१७ मे २०२६ रोजी रेल्वे स्टेशन चौक परिसरातील रोड डिव्हायडरवर वय अंदाजे ५० ते ५५ वर्षे
असलेला एक इसम बेशुद्ध अवस्थेत आढळून आला होता. त्याला तातडीने उपचारासाठी घाटी रुग्णालयात
दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी अंती त्याला मृत घोषित केले. या मृत व्यक्तीचे
वर्णन मध्ये वय अंदाजे ५० ते ५५ वर्षे.उंची
अंदाजे ५ फूट. रंग काळा-सावळा.
चेहरा लांबट गोल, नाक सरळ, डोळे काळे, डोक्यावर टक्कल
आहे.अंगावरील कपडे: निळ्या रंगाचे जॅकेट आणि राखाडी (ग्रे) रंगाची पँट.या वर्णनाच्या
व्यक्तीबाबत किंवा त्याच्या नातेवाईकांबाबत काहीही माहिती मिळाल्यास तातडीने वेदांत
नगर पोलीस ठाणे किंवा सहायक फौजदार एन. डी. गुजर (मोबाईल क्र. ९९२३२४९७९२) यांच्याशी
संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
00000

Comments
Post a Comment