औरंगाबाद येथे दि.18 रोजी इंडस्ट्रियल मिट औद्योगिक आस्थापना प्रतिनिधी, संघटना प्लेसमेंट एजन्सी यांनी सहभागी होण्याचे आवाहन
औरंगाबाद, दि. 10 (जिमाका)- उद्योजकांना आवश्यक कुशल मनुष्यबळ उपलब्ध करुन देणे, नोकरीच्या संधी, नोकरी समन्वयक
आणि इच्छुक उमेदवार यांना एका व्यासपीठावर आणणे या उद्देशाने शुक्रवार दि.18 रोजी
‘इंडस्ट्रियल मिट’चे आयोजन करण्यात आले आहे.
यासंदर्भात कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता
विभागाच्या वतीने महाराष्ट्रातील नोकरी इच्छुक उमेदवारांना रोजगार उपलब्ध करून
देण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत विविध योजना राबविण्यात
येतात, त्यापैकी पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा हे अधिक प्रभावी माध्यम
आहे. सदर रोजगार मेळाव्यात
उद्योजक व नोकरी इच्छुक उमेदवार यांना एका व्यासपीठावर आणून उद्योजकांकडे रिक्त
पदासाठी मुलाखती आयोजित करून तात्काळ नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यात येतात.
उद्योजकांना आवश्यक कुशल मनुष्यबळ उपलब्ध होणे हा त्यामागील उद्देश आहे.
राज्यातील बेरोजगार उमेदवारांना अधिक अधिक
रोजगार उपलब्ध व्हावा या उद्देशाने कौशल्य, रोजगार, उद्योजक्ता व नाविन्यता विभाग
यांचे मार्फत दि. 26 नोव्हेंबर 2022 रोजी राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री
यांचे उपस्थितीत नामांकित 14 इंडस्ट्रीज, इंडस्ट्रीज असोसिएशन व प्लेसमेंट एजन्सी
यांचे समवेत, दि. 22 एप्रिल 2023 रोजी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता
विभाग मंत्री, अपर मुख्य सचिव, आयुक्त, यांच्या
उपस्थित 16 उद्योजक व प्लेसमेंट एजन्सी यांचे समवेत एक लाख 35 हजार नोकऱ्या उपलब्ध
करून देण्याबाबत सामजंस्य करार करण्यात आलेले आहेत. पुणे विभागात दि. ९ जुन रोजी
१४१ आस्थापनांशी व मुंबई विभागात ठाणे येथे दि. १५ जुलै रोजी २८९ आस्थापना शी
देखील इंडस्ट्रियल मीट च्या माध्यमातून सामंजस्य कराराचे माध्यमातून ३ लाखांपेक्षा
जास्त नोकरी च्या संधी उपलब्ध होणार आहेत.
इंडस्ट्रियल
मीट चे आयोजन औरंगाबाद व नाशिक विभागाच्या वतीने औरंगाबाद येथे दिनांक 18 ऑगस्ट
2023 रोजी मसीहा हॉल, चिकलठाणा, एमआयडीसी, औरंगाबाद या ठिकाणी करण्यात आलेले आहे.
सदर कार्यक्रमास उपमुख्यमंत्री अजित पवार, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता
विभाग मंत्री मंगल प्रभात लोढा हे उपस्थित राहणार आहेत.
तरी सर्व औद्योगिक आस्थापना प्रतिनिधी,
औद्योगिक आस्थापना संघटना प्रतिनिधी, प्लेसमेंट एजन्सी प्रतिनिधी यांनी मोठ्या
संख्येने या कार्यक्रमासाठी उपस्थित रहावे असे आवाहन सु. द. सैंदाणे, उप आयुक्त
कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, औरंगाबाद विभाग, औरंगाबाद यांचे वतीने करण्यात
येतं आहे.
00000
Comments
Post a Comment