विशेष सखोल पुनरिक्षण (SIR)-२०२६ अंतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध ३० सप्टेंबरपर्यंत दावे व हरकती दाखल करण्याचे आवाहन
छत्रपती संभाजीनगर, दि. ३१ (जिमाका)- भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांच्या मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरिक्षण (Special Intensive Revision-SIR)-२०२६ अंतर्गत तयार करण्यात आलेली प्रारूप मतदार यादी आज प्रसिद्ध करण्यात आली आहे. नागरिकांनी प्रारूप मतदार यादीत आपले नाव असल्याची तसेच नाव, पत्ता, वय, लिंग व अन्य तपशील अचूक असल्याची खात्री करावी. आवश्यक असल्यास दावे व हरकती दि. ३० सप्टेंबरपर्यंत दाखल कराव्यात, असे आवाहन जिल्हा निवडणूक कार्यालयाने केले आहे. मतदार यादी तयार करण्यासाठी दि. १ ऑक्टोबर २०२६ हा अर्हता दिनांक निश्चित करण्यात आला आहे. या अर्हता दिनांकाच्या अनुषंगाने पात्र नागरिकांना मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी दावा करता येईल. तसेच मतदार यादीत समाविष्ट असलेल्या नावाबाबत अथवा नोंदीतील तपशीलाबाबत आक्षेप असल्यास दि. ३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर या कालावधीत विहित नमुन्यात दावा अथवा हरकत दाखल करता येईल. दावे व हरकतींसाठी विहित नमुने मतदार यादीत नवीन नाव समाविष्ट करण्यासाठी नमुना क्र. ६, मतदार यादीतील नावाच्या समावेशास हरकत घेण्यासाठी अथवा न...