शाळा परिसर तंबाखूमुक्त करा - जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी.
छत्रपती संभाजीनगर, दि. ८ (जिमाका) -जिल्ह्यात तंबाखू नियंत्रण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करणे, शाळा व शैक्षणिक संस्थांचा परिसर तंबाखूमुक्त करा.तंबाखूजन्य पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत व्यापक जनजागृती करा,असे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी आज दिल्या. राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हास्तरीय समन्वय व सनियंत्रण समितीची बैठक जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. बैठकीस अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पद्मजा सराफ, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी छाया आवरगावकर, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाचे आकाश तळवलकर, अन्न व औषध प्रशासनाचे डी. व्ही. पाटील, कामगार अधिकारी अक्षय ठोकळ यांच्यासह आरोग्य, शिक्षण, पोलीस व अन्य संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी गौडा म्हणाले की, शाळा व शैक्षणिक संस्थांच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होणार नाही, याची काटेकोर दक्षता घ्यावी. शैक्षणिक संस्थांच्या १०० यार्ड परिसरात तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीस असलेल्या प्रतिबंधाची प्रभावी अंमलब...