Posts

Showing posts from July, 2026

'पराक्रम दिना'निमित्त राज्यस्तरीय निबंध, वक्तृत्व व रिल्स स्पर्धांचे आयोजन 1 ते 15 ऑगस्टदरम्यान प्रवेशिका स्वीकारल्या जाणार; विद्यार्थी व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन

          छत्रपती संभाजीनगर, दि. 31 (जिमाका ) - महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्थेच्या महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), पुणे यांच्या वतीने श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी 18 ऑगस्ट हा दिवस राज्यभर 'पराक्रम दिन' म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्त 1 ते 15 ऑगस्ट 2026 या कालावधीत राज्यस्तरीय निबंध, वक्तृत्व व रिल्स स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून राज्यातील विद्यार्थी व नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन 'अमृत' संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांनी केले आहे. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या शौर्य, पराक्रम, नेतृत्वगुण आणि राष्ट्रनिष्ठेची ओळख नव्या पिढीला व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. स्पर्धांमध्ये शालेय, महाविद्यालयीन आणि खुला गट अशा विविध स्तरांवर निबंध व वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. रिल्स स्पर्धा महाविद्यालयीन व खुल्या गटासाठी आयोजित करण्यात आली आहे. निंबंध स्पर्धा निबंधाची शब्दमर्यादा जास्तीत जास्त 1000   शब्द असून मराठी, हिंद...

रजोनिवृत्ती व पीसीओडी विषयावरील राज्यस्तरीय प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन महिलांनी वेळेवर आरोग्य तपासणी करून घ्यावी- मेघना साकोरे-बोर्डीकर

Image
            छत्रपती संभाजीनगर, दि. ३० (जिमाका ) - महिलांनी रजोनिवृत्ती व पीसीओडीसंदर्भातील आरोग्य समस्यांकडे दुर्लक्ष न करता वेळेवर तपासणी करून तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. तसेच आरोग्य यंत्रणेने याबाबत व्यापक जनजागृती करून आवश्यक आरोग्यसेवा प्रत्येक महिलेपर्यंत पोहोचवावी, असे आवाहन राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी केले.               महिलांच्या आरोग्याशी संबंधित रजोनिवृत्ती (Menopause) आणि पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (PCOD/PCOS) विषयक आरोग्यसेवा अधिक सक्षम व परिणामकारक करण्याच्या उद्देशाने राज्यस्तरीय प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन महात्मा गांधी मिशन (एम.जी.एम.) वैद्यकीय महाविद्यालयाच्या   हॉलमध्ये सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या हस्ते झाले.                आरोग्य सेवा संचालक डॉ. विजय कंदेवाड, राज्य आरोग्य शिक्षण व संपर्क विभागाचे डॉ. कैलास बाविस्कर, उपसंचालक डॉ. आ...

'नशामुक्त भारत, मेरा युवा भारत'; जिल्हास्तरीय स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन

  छत्रपती संभाजीनगर, दि.२८(जिमाका) - युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार यांच्या मार्गदर्शनाखाली 'मेरा युवा भारत' (MY Bharat) छत्रपती संभाजीनगरच्या वतीने 'नशामुक्त युवा फॉर विकसित भारत' या राष्ट्रीय अभियानांतर्गत जिल्हास्तरीय सृजनशील स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा ३० जुलै २०२६ रोजी सकाळी ९:०० वाजता देवगिरी महाविद्यालयात होणार असून, यात युवक-युवतींनी   सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. भारताला व्यसनमुक्त आणि विकसित राष्ट्र बनविण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाने सुरू केलेल्या या अभियानाद्वारे युवकांमध्ये जनजागृती निर्माण करणे, सामाजिक उत्तरदायित्वाची भावना वाढीस लावणे आणि कला-साहित्याच्या माध्यमातून व्यसनमुक्तीचा प्रभावी संदेश समाजापर्यंत पोहोचविणे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे. या स्पर्धेमध्ये विविध कलाप्रकारांचा समावेश करण्यात आला असून, स्पर्धकांना आपल्या सृजनशीलतेद्वारे विचार मांडण्याची संधी मिळणार आहे, चित्रकला आणि घोषवाक्य लेखन,नृत्य, संगीत आणि पथनाट्य,भाषण आणि रील निर्मिती तसेच मुक्तछंद काव्य सादरीकरण (स्लॅम पोएट्री) याचा समावेश आहे....

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 जिल्ह्यातील 1 लाख 5 हजार 128 शेतकरी पात्र; ई.के.वाय.सी. फक्त १४ हजार जणांचे पूर्ण आधार प्रमाणीकरण तातडीने पूर्ण करण्याचे आवाहन

Image
    छत्रपती संभाजीनगर, दि. 27 (जिमाका) - राज्य शासनाच्या “ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना, २०२६ ” अंतर्गत जिल्ह्यातील १,२७६ गावांमधील एकूण १ लाख ५ हजार १२८ शेतकरी   पात्र ठरले आहेत. दरम्यान पात्र शेतकऱ्यांपैकी आतापर्यंत केवळ १४ हजार ७६९ शेतकऱ्यांनीच ईकेवायसी पूर्ण केले आहे. तरी उर्वरीत शेतकऱ्यांनी तात्काळ ईकेवायसी पूर्ण करावे,असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी केले आहे.               दरम्यान पात्र शेतकऱ्यांच्या नावांची यादी गावोगावी प्रसिद्ध होताच शेतकऱ्यांनी जाऊन आपले नाव असल्याची खात्री करण्यासाठी वि.का. सोसायटी, जिल्हा बॅंक, बॅंक, ग्रामपंचायत कार्यालय इ. ठिकाणी गर्दी केली होती.               या योजनेस मंजुरी मिळाल्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील १,२७६ गावांमधील १ लाख ९० हजार ७०१ शेतकऱ्यांची नावे अपलोड करण्यात आली आहेत. त्यापैकी आतापर्यंत १ लाख ५ हजार १२८ शेतकरी पात्र ठरले आहेत. (पात्र शेतकऱ्यांची संख...

जेहूर येथे आज (दि.28) पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा

  छत्रपती संभाजीनगर, दि. 27 (जिमाका)- जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विकास मार्गदर्शन केंद्र व साईराज स्किल डेव्हलपमेंट सेंटर जेहूर ता. कन्नड यांच्या संयुक्त विद्यमाने पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा जेहूर ता. कन्नड येथे सकाळी साडेनऊ वा. होनार आहे. या मेळाव्यात सहभागी व्हावे असे आवाहन सहायक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांनी केले आहे. 000000

नशामुक्त छत्रपती संभाजीनगरःमानवी साखळीद्वारे जनजागृती नशामुक्त जीवनासाठी संकल्प करु या - जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.

Image
    छत्रपती संभाजीनगर,दि.27 (जिमाका) - जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग   व सारा नवजीवन बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांमध्ये व्यसनमुक्तीबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने शहागंज परिसरात आज सकाळी विद्यार्थ्यांनी मानवी साखळी तयार करुन त्याद्वारे नशामुक्तीबाबत जनजागृती केली.   जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी विद्यार्थ्यांना नशामुक्त जिवनाचा संकल्प करण्याचे आवाहन केले.       जिल्हा परिषद, माध्यमिक, प्राथमिक शिक्षण विभाग,सारा नवजीवन बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला.समाज कल्याण विभाग, जिल्हा आरोग्य विभाग, राज्य उत्पादन शुल्क विभाग, पोलीस प्रशासन, महानगरपालिका तसेच विविध शासकीय विभाग ह्या उपक्रमात सहभागी झाले. तब्बल २ हजार शालेय विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला. "नशा छोडो, परिवार जोडो – नशा छोडो, भारत जोडो" या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला 'नशामुक्त छत्रपती संभाजीनगर' ही मानवी रांगोळी ५०० विद्यार्थ्यांनी साकारली. त्याचे ड्रोनद्वारे चित्रण करण्यात आले. जिल्हाधिकारी विनय...

सामाजिक उत्तरदायित्व निधीतून टोयोटा-किर्लोस्कर करणार पाणलोट विकास 16 कोटी निधीतून 6167 हेक्टरवर जलसंधारण, 11 हजारांहून अधिक ग्रामस्थांना होणार फायदा

Image
    छत्रपती संभाजीनगर,दि. 27 (जिमाका) - जिल्ह्यातील पैठण आणि छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील ९ गावांमध्ये 'वसुंधरा' या सर्वसमावेशक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. टोयोटा-किर्लोस्कर मोटर्सचा सामाजिक उत्तरदायित्व निधी, राज्य शासन आणि समुह सहभाग अशा योगदानातून हा उपक्रम राबविला जाणार असून या संदर्भात बुधवारी (दि.२२) सामंजस्य करार करण्यात आला,अशी माहिती वॉटरशेट ऑर्गनायझेशन ट्रस्टचे विभागीय व्यवस्थापक श्याम पडुळकर यांनी दिली.             ऑगस्ट २०२६ ते जुलै २०२९ या तीन वर्षांच्या कालावधीत हा प्रकल्प राबवला जाणार असून, यासाठी एकूण १६ कोटी ०५ लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. गोदावरी नदीच्या पाणलोट क्षेत्रात आणि जिल्हा मुख्यालयापासून सुमारे ३० ते ४० किमी अंतरावर असणाऱ्या या   ९ गावांमध्ये दरवर्षी एप्रिल ते जून दरम्यान तीव्र पाणीटंचाई जाणवते. या प्रकल्पाच्या माध्यमातून परिसरातील पाणीटंचाई दूर करून कृषी क्षेत्राला संजीवनी देण्याचा प्रयत्न केला जाईल.   हा प्रकल्प वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट ...

छत्रपती संभाजीनगरला मराठी भाषा विकास केंद्र सुरु करणार-उद्योग मंत्री उदय सामंत

Image
  छत्रपती संभाजीनगर, दि. २४(जिमाका)-   मराठी भाषेच्या विकासासाठी शासन पुढाकार घेत असून छत्रपती संभाजीनगर येथे हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने मराठी भाषा विकास केंद्र   १० कोटी रुपये खर्चून सुरु करीत आहे,अशी घोषणा राज्याचे उद्योग, मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी आज येथे केली. जिल्हाधिकारी कार्यालयात आज मराठी भाषा विभागाच्या वतीने आढावा बैठक व साहित्यिकांसमवेत संवाद या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. आ. विलास भुमरे, ज्येष्ठ साहित्यिक बाबा भांड, जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मनपा आयुक्त अमोल येडगे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी.एम., पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव, भाषा संचालनालयाचे संचालक अरुण गिते आदी उपस्थित होते. साहित्यिक विऱा. राठोड,गुलाबराव मगर आदी मान्यवरांनी आपले विचार मांडले. मान्यवर व्यक्तिंचे विचार ऐकल्यानंतर श्री. सामंत म्हणाले की, मराठी भाषेचा संस्कार हा घरातूनच व्हायला हवा. आपण लहान मुलांना मम्मी- पप्पा ऐवजी आई बाबा म्हणायला शिकवायला हवे. शासनाच्या पातळीवर आता प्रत्येक जिल्ह्यात मराठी भाषा कार्यालय सुरु करण्यात ये...

उद्योग संघटनाशी चर्चा; सूक्ष्म, लघु उद्योगांना सुयोग्य पद्धतीने भूखंड वाटप करा-उद्योग मंत्री उदय सामंत

Image
    छत्रपती संभाजीनगर, दि. २४(जिमाका)-   शेंद्रा बिडकीन औद्योगिक वसाहतीत सूक्ष्म व लघु उद्योगांना समन्यायी व सुयोग्य   पद्धतीने भूखंड उपलब्ध करून द्यावे,असे निर्देश उद्योग, मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी आज येथे दिले.             येथील ऑरिक सिटी सभागृहात उद्योग मंत्री सामंत यांनी उद्योग संघटनाशी संवाद साधला. बैठकीत उद्योजकांच्या विविध प्रश्नावर चर्चा करण्यात आली.             खा. संदीपान भुमरे, आ. रमेश बोरनारे, आ. अनुराधा चव्हाण, आ. विलास भुमरे,उपमहापौर राजेंद्र जंजाळ, महाराष्ट्र औद्योगिक वसाहत मर्या. चे व्यवस्थापकीय संचालक पी. डी. मलिकनेर, महाराष्ट्र उद्योग विकास महामंडळच्या सह. मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर घुगे, जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी., मुख्य अभियंता राहुल बनसोड, अधीक्षक अभियंता रमेशचंद्र गिरी, प्रादेशिक अधिकारी अमित भामरे, उप अभियंता नितिन जाधव, कार्यकारी अभियंता नागोराव राठोड,महाराष्ट्र औद्योगिक वसाहत मर्या. चे प्रकल्प व्यव...

शेंद्रा बिडकीन औद्योगिक वसाहत आढावा बैठक स्थानिकांना रोजगारात प्राधान्य, कौशल्य विकास केंद्र उभारण्यासाठी सामंजस्य करार करा-उद्योग मंत्री उदय सामंत

Image
  छत्रपती संभाजीनगर, दि. २४ (जिमाका)- प्रकल्प बाधीत शेतकरी व स्थानिकांना उभारल्या जाणाऱ्या उद्योगांमध्ये रोजगारासाठी प्राधान्य देणे हेच शासनाचे धोरण आहे. त्यासाठी कौशल्य विकास केंद्र तयार करून प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करावे, त्यासाठी टोयोटा किर्लोस्कर यांच्याशी सामंजस्य करार करावा, असे सुस्पष्ट निर्देश उद्योग, मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी आज येथे दिले.             येथील ऑरिक सिटी सभागृहात उद्योग मंत्री सामंत यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजीत करण्यात आली. बैठकीत प्रकल्प बाधित शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावर चर्चा करण्यात आली.             खा. संदीपान भुमरे, आ. अनुराधा चव्हाण, आ. विलास भुमरे, उपमहापौर राजेंद्र जंजाळ, महाराष्ट्र औद्योगिक वसाहत मर्या. चे व्यवस्थापकीय संचालक पी. डी. मलिकनेर, महाराष्ट्र उद्योग विकास महामंडळच्या सह. मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर घुगे, जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी., मुख्य अभियंता राहुल बनसोड, अधीक्षक अभियंता रमेशचंद्र गिरी, ...