संरक्षित शेती घटक साहित्य उत्पादक कंपन्यांची नोंदणी

 औरंगाबाद,दि.2 (जिमाका) – पॉलीफिल्म, टेपनेट, मोनोनेट, इन्सेक्ट, नेट, ॲप्रॉन पेपर, प्लास्टिक आच्छादान, जीआय पाईप इ. संरक्षित शेतीसाठी लागणाऱ्या घटक साहित्य उत्पादन/ पुरवठा करणाऱ्या कंपन्यांची नोंदणी प्रक्रिया महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळ,पुणे यांचे मार्फत राबविण्यात येत आहे. त्यासाठी इच्छुक कंपन्यांनी आपले प्रस्ताव दि.14 पर्यंत कृषी विभागाकडे पाठवावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख यांनी केले आहे.

योजनेचे स्वरुप

शासनामार्फत संरक्षित शेती तंत्रज्ञानास कृषी विभागाच्या विविध योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देऊन प्रोत्साहन दिले जाते. संरक्षित शेती घटकांतर्गत हरितगृह, शेडनेटगृह, प्लास्टिक मल्चिंग, द्राक्ष पिकासाठी प्लास्टिक कव्हर, डाळिंब पिकासाठी ॲन्टी हेल नेट या घटकांचा समावेश आहे. निवड झालेल्या लाभार्थ्यांना चांगल्या दर्जाचे साहित्य पुरवठा होणे, साहित्याची गँरटी वाँरटी व दुरस्ती याबाबत हमी मिळणे, याअनुषंगाने पॉलीफिल्म, टेपनेट, मोनोनेट,इन्सेक्ट, नेट, ॲप्रॉन पेपर, प्लास्टिक आच्छादन, जीआय पाईप, द्राक्ष पिकासाठी प्लास्टिक कव्हर व डाळिंब पिकासाठी ॲन्टी हेलनेट कव्हर या साहित्यांचे उत्पादन व पुरवठा करणाऱ्या उत्पादक कंपन्यांची नोंदणी प्रक्रिया महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळ,पुणे यांचे मार्फत राबविण्यात येत आहे.

इच्छुकांनी प्रस्ताव पाठवावे

 ही नोंदणी प्रक्रिया राबविण्याकरीता अटी व शर्तीच्या अधिन राहून उत्पादक कंपन्यांचे नोंदणी प्रस्ताव दि. 14 पर्यंत मागविण्यात आले आहेत. नोंदणी प्रक्रियेच्या अटी, शर्ती व इतर तपशील कृषी विभागाच्या www.mahanhm.inwww.krishi.maharashtra.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. इच्छुक कंपन्यांनी आपले अर्ज नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा