निवृत्ती वेतन धारकांना आयकर कपात प्रणाली

घोषणापत्र सादर करण्याचे आवाहन

औरंगाबाद,दि.3 (जिमाका) – जिल्हा कोषागाराअंतर्गत निवृत्ती वेतन घेणारे सर्व निवृत्तीवेतनधारक व कुटुंब निवृत्तीवेतन धारकांपैकी ज्या ज्या निवृत्तीवेतनधारकांचे, कुटुंबनिवृत्तीवेतनधारकांचे वार्षिक निवृत्तीवेतन रु 7 लक्ष च्या वर असेल त्या निवृत्तीवेतनधारकांनी आयकर कपातीबाबत जुनी, नवीन आयकर कपात प्रणाली लागु करणेबाबतचे घोषणापत्र दि.20 ऑगस्ट पूर्वी सादर करावे,असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच जुन्या आयकर कपात प्रणालीचा विकल्प दिला असल्यास त्यासंदर्भात बचतीचे कागदपत्रे, घोषणापत्रासोबत सादर करावे,असेही कळविण्यात आले आहे.ज्यांचे घोषणापत्र, बचतीचे कागदपत्रे विहित मुदतीत प्राप्त होणार नाहीत, त्यांचे नियमाप्रमाणे आयकर कपात करण्यात येईल,असे अपर कोषागार अधिकारी निवृत्तीवेतन शाखा यांनी कळविले आहे.

00000

 

Comments

Popular posts from this blog

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा

संघ लोकसेवा आयोगामार्फत दि.14 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय संरक्षण व नौसेना अकादमी परीक्षा –II

कापूस, सोयाबीन, मका हमी भावाने विक्रीः ‘कपास किसान’ व ‘ई- समृद्धी’ॲपवर नोंदणीची सुविधा