आरोग्य शिबीर आणि जात प्रमाणपत्र वाटपाने जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा
औरंगाबाद,
दि. 10 (जिमाका)- जागतिक
आदिवासी दिन (9 ऑगस्ट) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. जागतिक आदिवासी दिनानिमित्त
आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरास विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी
व जात प्रमाणपत्र वाटप करण्यात आले होते. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत विभागाच्या
मदतीने 1हजार जास्त प्रमाणपत्र जात प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. जिल्हा परिषदेचे मुख्य
कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी कार्यक्रमात सांगितले की, जात प्रमाणपत्र हे आदिवासी
बंधू भगिनी, विद्यार्थी, विद्यार्थिनींसाठी अतिशय महत्त्वाचे असून त्यांनी शासनाच्या
मदतीने तात्काळ प्राप्त करुन घ्यावे. यासाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प औरंगाबाद मदत करेल.
शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याचे प्रमाणपत्र दिले गेले पाहिजे यासाठी विभागाने एकात्मिक
आदिवासी विकास प्रकल्प औरंगाबाद कार्यालयाने मोहीम हाती घ्यावी. असे निर्देश विकास मीना यांनी
दिले.
आदिवासी विद्यार्थ्यांनी अतिशय कौशल्यपूर्ण पारंपारिक
नृत्याची सादरीकरण केले. शासकीय आश्रम शाळा तिसगाव यांनी पुस्तकहंडी फोडली. या नाविन्यपूर्ण
कार्यक्रमाचे कौतुक उपस्थिताने केले.
उपविभागीय अधिकारी कन्नड संतोष गोरड, तहसीलदार विद्याचरण
कडावकर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.लोखंडे, एकलव्य आदिवासी संघटनेचे पवन राजे सोनवणे,
शासकीय अनुदानित आश्रम शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक शासकीय अनुदानित आश्रम शाळेतील
विद्यार्थी-विद्यार्थिनी परिसरातील आदिवासी बंधू आणि भगिनी उपस्थित होते.
जागतिक
आदिवासी दिनानिमित्त बारावी व दहावी मध्ये एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय
मधून प्रथम व द्वितीय क्रमांक मिळावलेल्या सर्व गुणवंतांचा सत्कार करण्यात आला यामध्ये
अनिल मोरे या विद्यार्थ्याने मॅचेस्टर विद्यापीठामध्ये प्रवेश मिळाल्याबद्दल आदिवासी
आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांची पारंपारिक आदिवासी नृत्य स्पर्धा सहभाग नोंदवला. प्रथम
क्रमांक शासकीय आश्रम शाळा नागद, द्वितीय क्रमांक अनुदानित आश्रम शाळा चौका, तृतीय
क्रमांक शासकीय आश्रम शाळा थिटेगव्हाण यांना देण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहायक प्रकल्प अधिकारी
(शिक्षण) डॉ. उद्धव वायाळ यांनी केले. तर सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक
प्रकल्प अधिकारी (शिक्षण) विनोद कुमार सांगळे व श्रीमती सरिता गाडेकर यांनी केले.
कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.
00000
.jpeg)

Comments
Post a Comment