एड्स जनजागृतीसाठी आज मॅरेथॉन स्पर्धा

 


औरंगाबाद, दि. 11 (जिमाका)-  युवकांमध्ये एचआयव्ही, एड्स विषयक जनजागृती व्हावी यासाठी आंतरराष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून  शनिवार दि.12 रोजी  जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथक, जिल्हा रुग्णालय, व क्रिडा विभाग,डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने 18 ते 25 वर्षे वयोगटातील विद्यार्थीनी व विद्यार्थ्यांकरीता मॅरेथॉन  स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

रेड रिबन क्लब (RRC)  महाविद्यालयांचा या उपक्रमात सहभाग असून दि. 12 रोजी सकाळी 7 वा. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या क्रीडा विभागापासून स्पर्धा सुरु होईल. तेथून विद्यापीठ गेट, लिट्ल फ्लॉवर शाळा चौक मार्गे पुन्हा क्रीडा  विभाग, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथे समारोप होईल. स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके व प्रमाणपत्रे देऊन सन्मानित केले जाणार आहेत, असे आयोजकांनी कळविले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा