महसूल सप्ताह: ‘सैनिक हो तुमच्यासाठी’अंतर्गत सैनिक व कुटुंबियांच्या समस्यांची सोडवणूक
औरंगाबाद,दि.5 (जिमाका)-महसूल सप्ताहानिमित्त ‘सैनिक हो तुमच्यासाठी’ या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले. यानिमित्ताने जिल्ह्यातील सैनिक, माजी सैनिक, विरमाता, विरपत्नी, विरपिता, शहिदांचे वारस अशा घटकांचे म्हणणे जाणून घेऊन त्यांच्या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी यथोचित मार्गदर्शन करण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित
या कार्यक्रमास अपर जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन
विधाते, उपविभागीय अधिकारी रामेश्वर रोड्गे, तहसिलदार विजय चव्हाण तसेच अन्य महसूल
विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमास जिल्ह्यातील सैनिक, माजी
सैनिक, विरमाता, विरपत्नी, विरपिता, शहिदांचे वारस उपस्थित होते. त्यांनी त्यांच्या
जमिन संपादनाचे प्रश्न, नोकरी, मुलांचे शिक्षण तसेच विविध प्रश्नांबाबत व्यक्तिगत म्हणणे
मांडले. त्याप्रमाणे त्यांच्या प्रश्नांची तात्काळ सोडवणूक करण्यासाठी निर्देश देण्यात
आले. तसेच विविध कायदेशीर प्रक्रियांबाबत मार्गदर्शन
करण्यात आले.
00000



Comments
Post a Comment