कांचनवाडी येथे मतदार नोंदणी शिबिर

 








औरंगाबाद, दि. 11 (जिमाका)-  येथील  छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था कांचनवाडी आणि शिवछत्रपती महाविद्यालय सिडको  येथे गुरुवारी (दि.10) नव मतदार नोंदणी शिबिर आयोजित करण्यात आले.

अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.श्रीकांत देशमुख तर प्रमुख पाहुणे म्हणून उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके, उपजिल्हाधिकारी तथा 108 पश्चिमच्या मतदार नोंदणी अधिकारी श्रीमती अर्चना खेतमाळीस, तहसीलदार तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी श्रीमती सोनाली जोंधळे, स्विप समन्वयक मनोज बोरुडे उपस्थित होते.

देवेंद्र कटके यांनी विद्यार्थ्यांना  मतदानाच्या अधिकारासंदर्भात मार्गदर्शन केले व voter Helpline app द्वारे नवमतदारांना नाव नोंदणी करण्याबाबत आवाहन केले. शिबिरात  360  विद्यार्थ्यांची  प्राथमिक स्वरूपात नावनोंदणी झाली. शिबिरास नवमतदारांनी उत्तम प्रतिसाद दिला.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा