शासकीय कर्मचाऱ्यांचा सर्वंकष माहितीकोष आहरण संवितरण अधिकाऱ्यांनी माहिती पाठवावी
औरंगाबाद, दि.
18 (जिमाका) – जिल्हा सांख्यिकी कार्यालयातर्फे
शासकीय कर्मचाऱ्यांचा सर्वकष माहितीकोष तयार करण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी आहरण
व संवितरण अधिकाऱ्यांनी (DDO) अधिनस्त अधिकारी व कर्मचाऱ्यांची माहिती सादर करावी,असे
आवाहन उपसंचालक जिल्हा सांख्यिकी कार्यालय शी. वै. मिसाळ यांनी केले आहे.
अर्थ व सांख्यिकी संचालनालय मुंबई या कार्यालयाकडून शासनाच्या
सेवेतील सर्व कर्मचाऱ्यांचा सर्वंकष माहितीकोष दरवर्षी अद्यावत करण्यात येतो. त्यात
नियमित आस्थापनेवरील कर्मचारी,नियमिततेतर आस्थापनेवरील कर्मचारी, तसेच तदर्थ तत्त्वावर
नेमणूका करण्यात आलेले कर्मचारी यांची माहिती दि.1 जुलै 2023 या दिनांकास अनुसरून गोळा
करण्यात येत आहे.
यासंदर्भात जिल्ह्यातील सर्व आहरण संवितरण अधिकाऱ्यांनी ऑनलाईन
संगणकीय आज्ञावलीत दि. 1 सप्टेंबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीत पूर्ण करावयाची आहे.
जिल्हा सांख्यिकी कार्यालयाकडून दिले जाणारे माहिती नोंदणी केल्याचे पहिले प्रमाणपत्र
नोव्हेंबर 2023 मध्ये तर दुसरे प्रमाणपत्र
फेब्रुवारी 2024 च्या वेतन देयकासोबत जोडणे अनिवार्य आहे. तरी आहरण संवितरण
अधिकाऱ्यांनी यासंदर्भात कार्यवाही करुन शासकीय कर्मचारी माहितीकोष तयार करण्यास सहकार्य
करावे,असे आवाहन उपसंचालक जिल्हा सांख्यिकी कार्यालय, औरंगाबाद श्रीमती शी. वै. मिसाळ
यांनी केले आहे.
00000
Comments
Post a Comment