जिल्हास्तरीय दुध भेसळ प्रतिबंधक समिती बैठक : संकलित व वितरीत होणाऱ्या दुधाचे नमुने तपासा- अपर जिल्हाधिकारी लोखंडे

 औरंगाबाद,दि.2 (जिमाका): जिल्ह्यात दुध विक्री व दुग्धजन्य पदार्थ विक्री करतांना त्यात भेसळयुक्त तसेच  मुदतीनंतर विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 अंतर्गत कारवाई करण्यासाठी संकलित व वितरीत होणाऱ्या तसेच बाहेर जिल्ह्यातून येणाऱ्या दुधाचे नमुने तपासा असे निर्देश अपर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे यांनी आज दिले. जिल्हास्तरीय दुध भेसळ प्रतिबंधक समितीची बैठक आज पार पडली. बैठकीस अपर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे, अन्न औषध प्रशासन सहायक आयुक्त अ.अ.मैत्रे, जिल्हा पशुंसवर्धन उपायुक्त डॉ.पी.डी. झोड, उपनियंत्रक वैध मापन शास्त्र आर.डी. दराडे, जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी मनीषा हराळ-मोरे आदी उपस्थित होते.

या बैठकीत दुध व दुग्धजन्य पदार्थ तपासणी कार्यवाहीबाबत प्राथमिक स्वरुपाची  रुपरेषा ठरविण्यात आली. तसेच समितीने धडक कार्यवाही पुर्व तयारीचा आढावा घेतला. दुध व दुग्धजन्य पदार्थांमध्ये होणाऱ्या भेसळीविरोधात कारवाई करतांना  भेसळ प्रक्रियेत सहभागी व्यक्ती व आस्थापनांविरुद्ध कायदेशीर कारवाई करावी. दुध विक्रेते, मिठाई विक्रेते, दुग्धजन्य पदार्थ विक्रेते यांनी विक्री करत असलेले दुध व दुग्धजन्य पदार्थ हे उच्च दर्जाचे व भेसळविरहीत निर्माण होतील यासाठी विशेष व्यवस्था निर्माण करावी. अशा पदार्थांच्या वापराची मुदत नमूद असावी. असे मुदतपूर्व दिनांक पदार्थांच्या पॅकेटवर नमुद असणे बंधनकारक आहे. यासंदर्भात जिल्ह्यात खवा, मावा इ. दुध व दुग्धजन्यपदार्थ विक्री होत असलेल्या ठिकाणी नियमित तपासणी करुन जिल्हास्तरीयसमिती मार्फत अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 अंतर्गत कारवाई करावी, असे निर्देश अरविंद लोखंडे यांनी दिले.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा