बालशक्ती पुरस्कारासाठी अर्ज मागविले; अर्ज ऑनलाईन स्विकारण्याचीही सुविधा

 


औरंगाबाद, दि. 11 (जिमाका)- केंद्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत बाल शक्ती व बालकल्याण पुरस्कार दिला जातो. सन 2024 करीता केंद्र शासनाने या पुरस्कारांसाठी पात्र व्यक्ती, संस्थांकडूनअर्ज मागविले आहेत. अर्ज स्विकारण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध असून इच्छुक व्यक्ती व संस्थांनी अर्ज करावे, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुनिल अंकूश यांनी केले आहे.

पुरस्कारासाठी निकषः बालशक्ती पुरस्कार- 5 वर्षे ते 18 वर्षे वयोमर्यादा. शिक्षण, कला, सांस्कृतिक कार्य, खेळ नाविन्यपूर्ण शोध, सामाजिक कार्य व शौर्य अशा क्षेत्रात विशेष नैपुण्यपूर्ण कामगिरी.  

बालकल्याण पुरस्कार- (वैयक्तिक) बालविकास, संरक्षण व कल्याण या क्षेत्रात किमान 7 वर्षे मानसेवी कार्य काम. (संस्था) बालकल्याण क्षेत्रात अपवादात्मक कार्य, संस्था पूर्णतः शासनाच्या निधीवर अवलंबून नसावी. किमान 10 वर्षे सातत्यपूर्ण उत्कृष्ट कार्य करणारी असावी.

पुस्कारासाठीचे अर्ज www.awards.gov.in ह्या संकेतस्थळावर ऑनलाईन स्वीकारले जाणार आहेत. पुरस्काराची माहिती संकेतस्थळावर देण्यात आली आहे. तरी इच्छुक संस्था, व्यक्तिंनी दि.31 ऑगस्ट पर्यंत अर्ज करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा