ऑनलाईन
पद्धतीने करता येणार मतदार यादीत नाव नोंदणी व दुरुस्ती
नवमतदार नाव नोंदणी करावी-जिल्हाधिकारी
आस्तिककुमार पाण्डेय यांचे आवाहन
औरंगाबाद,दि.3 (जिमाका) –
मतदार जनजागृती अभियानांतर्गत नव मतदारांनी नाव नोंदणी करावी, तसेच नागरिकांना आता
वोटर हेल्पलाईन या मोबाईल ॲपद्वारे आपले नाव मतदार यादीत नोंदवणे, नाव वगळणे, पत्ता
बदल इ. बाबतची कामे स्वतः घरबसल्या करता येणार आहेत. नागरिकांनी यासेवेचा लाभ घ्यावा,असे
आवाहन जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी
केले आहे.
या
https://play.google.com/store/apps/details?id=com.eci.citizen
लिंकचा वापर करून नागरिकांनी भारत निवडणूक आयोगाद्वारे तयार केलेले
वोटर हेल्पलाइन (Voter helpline) ॲप डाऊनलोड करावे. कोणत्याही शासकीय कार्यालयात न जाता ॲपच्या मदतीने
घर बसल्या मतदार यादीत नाव समाविष्ट करू शकतात
अथवा अस्तित्वात असलेल्या नाव, फोटो इत्यादीत काही दुरुस्ती असल्यास दुरुस्तीही करू
शकतात व मयत मतदाराचे नावे नातेवाईक वगळणी देखील करू शकतात. मोफत व घरपोच मतदान ओळखपत्र EPIC मिळवता
येते. तरी नवमतदार, नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी आस्तिककुमार
पाण्डेय यांनी केले आहे.
00000
Comments
Post a Comment