ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक रंगनाथ आसाराम हिवाळे यांचा सत्कार

 






औरंगाबाद, दि. 15 (जिमाका) – भारत छोडो आंदोलनाच्या वर्धापन दिनानिमित्ताने स्वातंत्र्य सैनिक निवृत्ती वेतनधारक ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक रंगनाथ आसाराम हिवाळे ता. पैठण रा. बिडकीन यांचा जिल्हा प्रशासनाच्या वतीने सत्कार करण्यात आला.     

भारत छोडो आंदोलनाच्या वर्धापन दिनानिमित्ताने आज दि. 15 ऑगस्ट  रोजी जिल्ह्यातील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिकाचा सत्कार करण्याचे निर्देश देण्यात आले होते. यामध्ये जिल्ह्यातील रंगनाथ आसाराम हिवाळे राहणार बिडकीन तालुका पैठण, यांचा पैठण - फुलंब्री उपविभागीय अधिकारी सोहम वायाळ यांनी हिवाळे यांच्या हस्ते बिडकीन निवासस्थानी जाऊन शासनाच्या वतीने सत्कार करण्यात आला. 

केंद्र सरकारकडून भेटवस्तू देण्यात आली. जिल्हाधिकारी अस्तिककुमार पाण्डेय यांच्या मार्गदर्शनाखाली स्वातंत्र्यदिनानिमित्त स्वातंत्र्यसैनिकांना भेटीचे आयोजन केले होते. यावेळी हिवाळे यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य गावातील प्रतिष्ठित' नागरिक ,ग्रामपंचायत सदस्य, बिडकीन पोलीस स्टेशनचे, ठाणेदार गणेश सुरवसे ,मंडळ अधिकारी संभाजी देशमुख, तलाठी काशीकर व सर्कलचे सर्व तलाठी हजर होते.

00000

Comments

Popular posts from this blog

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा

संघ लोकसेवा आयोगामार्फत दि.14 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय संरक्षण व नौसेना अकादमी परीक्षा –II

कापूस, सोयाबीन, मका हमी भावाने विक्रीः ‘कपास किसान’ व ‘ई- समृद्धी’ॲपवर नोंदणीची सुविधा