जिल्ह्यात विविध उपक्रमाने महसूल सप्ताह साजरा

             औरंगाबाद,दि.2 (जिमाका)- पैठण येथे महसुल सप्ताहाच्या निमित्ताने  आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या नागरिकांनी  उत्साहाने भाग घेतला. कार्यालयातील सर्व तलाठी, मंडळ अधिकारी, अव्‍वल कारकून यांच्यासह 40 महिला व 30 पुरुषांची नागरिक आरोग्य तपासणी करण्यात आली.

        शिबिरात 38 रक्तदात्यांनी रक्तदान केले. आरोग्य तपासणीसाठी आरोग्य विभागाच्या मार्फत रक्तातील हिमोग्लोबिन, थायरॉईड, ॲनिमिया, कॅन्सर, डिक्टेशन यासह सोळा प्रकाराच्या चाचण्या करण्यात आल्या. आज युवा संवादामध्ये जिजामाता कन्या विद्यालयातील विद्यार्थिनींची कार्यालयात भेट आयोजित करण्यात आली. या भेटी मध्ये महसुल कार्यालयाच्या कामाकाजाविषयी माहिती देण्यात आली.  

        यावेळी तहसीलदार पैठण सारंग चव्हाण तसेच महसूल विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. एक हात मदतीचा यामध्ये पात्र लाभार्थ्यांना रेशन कार्ड वाटप करण्यात आले. तहसील कार्यालय व श्री संत एकनाथ महाराज समाधी मंदिरात आधार कार्ड दुरुस्ती व अद्यावतीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. सदरील आधार केंद्रावर 150 आधार कार्ड अद्यावत करण्यात आले आहे.

            रांगोळी व माहिती दर्शविणाऱ्या विविध विभागाच्या फलकांनी कार्यक्रम वैविध्यपूर्ण करण्यात आला. महसुल सप्ताहात आयोजित केलेल्या विविध उपक्रमांचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन उपविभागीय अधिकारी सोहम वायाळ व तहसीलदार पैठण सारंग चव्हाण यांनी केले आहे.

खुलताबाद तहसिल कार्यालयात महसुल सप्ताह साजरा

            खुलताबाद तालुक्यातील गल्लेबोरगाव येथील नाथ विद्यालयात ९ वी ते 12 वी  विद्यार्थ्यांना शैक्ष्‍ाणिक  कामकाजानिमित्‍त विविध प्रमाणपत्राचे तहसिलदार स्वरूप कंकाळ यांच्‍या हस्ते वाटप करण्‍यात आले. विद्यार्थांची आधार नोंदणी, आधार कार्ड दुरुस्‍ती करण्‍यासाठी शिबीर  आयोजित आले होते. युवा संवाद मार्फत महाविद्यालयीन युवक, ग्रामस्थ, शेतकरी यांच्‍याशी संवाद साधून त्‍यांना ई-पीक पाहणीचे महत्‍व समाजावून सांगितले. ई-पीक  मोबाईल द्वारे ई-पीक पाहणी प्रशिक्षण देण्यात आले.

या वेळी मुख्याध्यापक संदीप खोसरे यांनी निवासी नायब तहसीलदार नीलम लूनावत नायब तहसीलदार प्रमोद सावंत यांचा सत्कार केला. ऋषिकेश खोसरे मंडळ अधिकारी भाग्यश्री दूतोंडे तलाठी कल्पना दिघोळे, शेखर बावस्कर, किशोर कुलकर्णी, सुनील कोठावळे तसेच आपले सरकार केंद्र चालक सुधाकर दहिवाल, शिक्षकवृंद शालेय विद्यार्थी ग्रामस्थ शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

00000

 

 

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा