विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा
महिला आर्थिक विकास महामंडळ ( माविम) हा महाराष्ट्र शासनाचा एक महत्त्वपूर्ण आणि अंगीकृत उपक्रम असून , महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी कार्यरत आहे. २४ फेब्रुवारी १९७५ रोजी महिला सक्षमीकरणाचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून या महामंडळाची स्थापना करण्यात आली. पुढे २० जानेवारी २००३ रोजी माविमला महिला विकासासाठी राज्यस्तरीय “ शिखर संस्था ” म्हणून मान्यता देण्यात आली. माविम केंद्र व राज्य शासनाच्या विविध महिला सक्षमीकरण योजनांची राज्यस्तरीय नोडल एजन्सी म्हणून अंमलबजावणी करते. तसेच शासन विभाग , वित्तीय संस्था , स्वयंसेवी संस्था आणि स्वयंसहाय्य गट यांच्यात समन्वय साधून एक मजबूत दुवा म्हणून कार्य करते.माविमचे मुख्यालय मुंबई येथे असून , राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये त्याची कार्यालये कार्यरत आहेत. माविमचे ध्येय्य व उद्दिष्टेः- माविमचे मुख्य ध्येय म्हणजे नि रंतर विकास प्रक्रियेद्वारे महिलांसाठी सामाजिक , आर्थिक व राजनैतिक न्याय प्रस्थापित करणे , हे होय. तर महत्वाची उद्दिष्टे खालीलप्रमाणे सांगता येतील. ग्रामीण महिलांचे संघटन करणे महिलांच्या क्षमता विकसित करणे आत्मविश्वास ...
Comments
Post a Comment