अनाथ बालकांना प्रमाणपत्र; महिला व बालविकास विभागात स्वतंत्र कक्ष

 छत्रपती संभाजीनगर, दि.२६(जिमाका):- महिला व बालविकास विभागातर्फे अनाथ बालकांणा आवश्यक सर्व कागदपत्रे दाखले देण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. दि.५ मार्च पर्यंत ही मोहिम सुरु राहिल.  या काळावधीत अनाथ बालकांना आधार कार्ड, रेशन कार्ड, जातीचा दाखला, अधिवास प्रमाणपत्र, राष्ट्रीयत्वाचा दाखला, मतदान कार्ड इ. उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.  जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, जाधव यांची इमारत, प्लॉट नं. ९ खोकडपुरा, छत्रपती संभाजीनगर येथे त्यासाठी एक समर्पित कक्ष  स्थापन करण्यात आला आहे. अनाथ बालकांनी अथवा त्यांच्या नातेवाईकांनी या समर्पित कक्षातील  परीविक्षा अधिकारी  विजय विघ्ने, जिल्हा बालसंरक्षण अधिकारी महादेव डोंगरे (९५१८९५८३५५), श्रीमती सुप्रिया इंगळे, दीपक बजारे (९३७०००३५१७) यांच्याशी संपर्क करावा,असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी श्रीमती सुवर्णा जाधव यांनी केले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा

संघ लोकसेवा आयोगामार्फत दि.14 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय संरक्षण व नौसेना अकादमी परीक्षा –II

कापूस, सोयाबीन, मका हमी भावाने विक्रीः ‘कपास किसान’ व ‘ई- समृद्धी’ॲपवर नोंदणीची सुविधा