निवडणूक पूर्वतयारीःनोडल अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण ; स्वतःला प्रशिक्षीत करुन ‘अपडेट’ व्हा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

 






छत्रपती संभाजीनगर, दि.२४(जिमाका):- येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून आज जिल्हाधिकारी कार्यालयात नोडल अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण झाले. निवडणूक आयोगाने दिलेल्या सर्व माहिती पुस्तकांचा व सर्व नियमांच्या माहितीचा अभ्यास करा. पुस्तकातील मार्गदर्शनानुसार स्वतःला प्रशिक्षीत करुन ‘अपडेट’ व्हा, असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजन सभागृहात पार पडलेल्या या प्रशिक्षणास अपर जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे,  उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके, निवासी उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे,  अति.आयुक्त मनपा रणजीत पाटील तसेच सर्व विभाग प्रमुख, उपजिल्हाधिकारी आदी सहभागी झाले होते.

जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की, लोकप्रतिनिधीत्वाच्या कायद्यातील तरतूदीनुसार निवडणूका होत असतात. तथापि, निवडणूक आयोगाने निवडणूक प्रक्रियेसंदर्भात सविस्तर व अत्यंत सखोल पद्धतीने नियमावली तयार केलेल्या आहेत. या सर्व सुचना व निर्देश हे वेळोवेळी अद्यावतही केले जातात.  त्या सर्व नियमांचा अभ्यास करा. आपल्या अधिनस्त कर्मचाऱ्यांना त्याबाबत माहिती द्या.  स्वतः प्रशिक्षीत व्हा व अपडेट व्हा, असे त्यांनी सांगितले.

आचार संहिता अंमलबजावणी,  मतदार ओळखपत्र, माध्यम संनियंत्रण समिती, मतदान यंत्रे, मतमोजणी, मतदार जनजागृती, वाहतुक, कायदा सुव्यवस्था अशा विविध समित्यांच्या कार्यप्रणाली, करावयाची कामे, नियम व सुचना याबाबत सादरीकरण करुन माहिती देण्यात आली.

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा