बालगृहासाठी इमारत भाड्याने हवी; इच्छुकांकडून प्रस्ताव मागविला
छत्रपती संभाजीनगर, दि.22 (जिमाका):- अधीक्षक, शासकीय मुलांचे बालगृह (वसतीगृह) जालना ही संस्था छत्रपती संभाजीनगर येथे स्थलांतरीत करण्यात आली आहे. या बालगृहास बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम -2015 अन्वये व महाराष्ट्र राज्य बाल न्याय (मुलांची व काळजी व संरक्षण) नियम 2018 चे नियम 31 भौतिक सोयीसुविधा (6) च्या निकषानुसार इमारत 8745 चौ.फुट इमारत बांधकाम क्षेत्र त्यात स्नानगृहे -5, प्रसाधनगृह-8 पिण्याच्या व वापराच्या पाण्याच्या व्यवस्थेसह सुस्थितीत शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी व प्रवेशितांच्या दृष्टीने सुरक्षित आवारात उपलब्ध असलेली सुसज्य इमारत शासकीय संस्थेस बांधकाम विभागाच्या चटई क्षेत्राच्या दरानुसार भाडे तत्वावर घ्यावयाची आहे. अशी सर्व सोयीयुक्त इमारत उपलब्ध असल्यास जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, प्लॉट नं.9 श्री.जाधव यांची इमारत खोकडपुरा, छत्रपती संभाजीनगर या कार्यालयाशी बातमी प्रसिद्ध झाल्यापासुन 15 दिवसापर्यंत संपर्क साधावा. तसेच इमारत भाडे बाबतचा प्रस्ताव सादर करावा. असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुवर्णा एच.जाधव (संपर्क क्रमांक – 9405530815) यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
00000
Comments
Post a Comment