महाराष्ट्र ॲग्रीबिझीनेस नेटवर्क प्रकल्प (मॅग्नेट) अंतर्गत आज शेतकरी उत्पादक कंपनी प्रतिनिधींची राज्यस्तरीय कार्यशाळा

 


छत्रपती संभाजीनगर, दि.२२ (जिमाका):- शासनामार्फत आशियाई विकास बॅंक अर्थसहाय्यीत राबविण्यात येत असलेल्या महाराष्ट्र ॲग्रीबिझीनेस नेटवर्क प्रकल्प (मॅग्नेट) अंतर्गत शुक्रवार दि.२३ रोजी शेतकरी उत्पादक कंपनी प्रतिनिधींची राज्यस्तरीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. सकाळी साडे दहा वा. संत एकनाथ रंगमंदिर सभागृह, छत्रपती संभाजीनगर येथे ही कार्यशाळा होणार आहे.

कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी पणन, अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्री अब्दुल सत्तार हे राहणार आहेत. तर राज्याचे रोजगार हमी योजना, फलोत्पादन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे , सहकार व पणन विभागाचे अपर मुख्य सचिव  तथा मॅग्नेटचे अध्यक्ष राजेशकुमार, आशियाई विकास बॅंकेचे प्रोजेक्ट लीड क्रिशन रौतेला, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, राज्य कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम, पणन संचालक डॉ. केदारी जाधव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

प्रकल्पाचा उद्देशः राज्यातील निवडक फळे व भाजीपाला पिकातील  मूल्यसाखळ्या विकसीत करुन  उत्पादकांना त्यांच्या शेतमालाला जास्तीत जास्त दर मिळवून देण्यासाठी मॅग्नेट प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येत आहे.  केळी, डाळींब, संत्रा, मोसंबी, संत्रा, सिताफळ, पेरु, स्ट्रॉबेरी, आंबा, चिकू, काजू, मिरची, भेंडी, पडवळ आणि फुले या पिकांमध्ये कामकाज करणाऱ्या शेतकरी उत्पादक संस्थांमधील उत्पादकांना  प्रशिक्षित करणे, संस्थात्मक सबळीकरण करणे, नवनवीन माहिती उपलब्ध करुन देणे, खेळते भांडवल व मुदत कर्जाची  उपलब्धता, पायाभुत सुविधा निर्मिती करणे इ. घटकांची अंमलबजावणी करणे.

कार्यशाळेत सहभागी होण्याचे आवाहन प्रकल्प संचालक विनायक कोकरे यांनी केले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा