उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा जिल्हादौरा
छत्रपती संभाजीनगर, दि.२२ (जिमाका):- उपमुख्यमंत्री अजित पवार हे शुक्रवार दि.२३ रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.
त्यांचा दौरा कार्यक्रम
याप्रमाणे-
शुक्रवार दि.२३ रोजी
सकाळी पावणे आठ वा छत्रपती संभाजीनगर विमानतळावर आगमन व जिल्हाधिकारी कार्यालयाकडे
प्रयाण, सकाळी आठ वा. जिल्हाधिकारी कार्यालय येथे आगमन व आढावा बैठक. सकाळी साडेनऊ
वा. पत्रकार परिषद, स्थळ- जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय. मोटारीने
गंगापूर कडे प्रयाण, सकाळी पावणे अकरा वा. फैसल चाऊस यांचे निवासस्थान पोस्ट ऑफिसजवळ
गंगापूर येथे आगमन व राखीव. नंतर जामगाव टी पॉईंट गंगापूर कडे प्रयाण सकाळी सव्वा
अकरा वा. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचा अनावरण
समारंभास उपस्थिती, सकाळी पावणे बारा वा. जाहीर सभा, स्थळ- सोमाणी मैदान बस स्टॅण्डजवळ. दुपारी सव्वा वा. संजय जाधव यांचे निवासस्थान,
न्यू बसस्टॅण्ड जवळ येथे आगमन व राखीव. नंतर मोटारीने छत्रपती संभाजीनगर कडे
प्रयाण, दुपारी ३ वा. राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग
राज्यव्यापी संविधान गौरव मेळावा. सायं. ५ वा. सुभेदारी विश्रामगृह येथे आगमन व
राखीव. सायं. ६ वा. औरंगाबाद किडनी हॉस्पिटल भुमिपूजन सोहळा व कार्डियाक
ॲम्ब्युलन्स सेवा लोकार्पण, सायं. साडेसहा वा. अंबाजोगाई पिपल्स को.ऑप बॅंक मर्या.
अंबाजोगाई च्या छत्रपती संभाजीनगर शाखेचा उद्घाटन सोहळा. सायं ७ वा. ५५ मि. नी
छत्रपती संभाजीनगर विमानतळ येथे आगमन व विमानाने पुणेकडे प्रयाण.
Comments
Post a Comment