मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ; लाभार्थ्यांसाठी आज (दि.२१) कार्यशाळा

 छत्रपती संभाजीनगर, दि.२०(जिमाका)- मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ मर्या.तर्फे अल्पसंख्याक समाजातील गरजू लाभार्थी व विद्यार्थ्यांसाठी शनिवार दि.२१ रोजी सकाळी ११ वा. एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेचे उद्घाटन अल्पसंखाक विकास औकाफ मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार ह्यांच्या हस्ते होणार आहे. ही कार्यशाळा हज हाऊस येथील सभागृहात होणार आहे. या कार्यशाळेत  डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम शैक्षणिक कर्ज योजना, मुदत कर्ज योजना, सुक्ष्म पतपुरवठा योजना, मौलाना आझाद शैक्षणिक कर्ज योजनांबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे,असे व्यवस्थापकीय संचालक ग.पि.मगदूम यांनी कळविले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा

संघ लोकसेवा आयोगामार्फत दि.14 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय संरक्षण व नौसेना अकादमी परीक्षा –II

कापूस, सोयाबीन, मका हमी भावाने विक्रीः ‘कपास किसान’ व ‘ई- समृद्धी’ॲपवर नोंदणीची सुविधा