स्वच्छतेची सवय; स्वभाव आणि संस्कार व्हावी- प्रधान सचिव संजय खंदारे

 








छत्रपती संभाजीनगर, दि.२३(जिमाका):-समाजामध्ये नागरिकांनी  वैयक्तिक स्वच्छतेप्रमाणे सार्वजनिक ठिकाणीही स्वच्छता राखणे आवश्यक आहे. स्वच्छतेची सवय ही स्वभाव आणि संस्कार व्हावी, असे प्रतिपादन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे यांनी आज येथे केले. 

            ‘स्वच्छता ही सेवा’ या उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या वतीने ‘सफाई मित्र सुरक्षा’ शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

            पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास मीना,अभियान संचालक ई. रविंद्रन ,अतिरिक्त अभियान संचालक शेखर रौंदळ. पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र देसले, सुदर्शन तुपे, गटविकास अधिकारी मीना राऊताळे, सहाय्यक गट विकास अधिकारी शिवाजी साळुंखे विविध योजनेचे लाभार्थी, स्वच्छता मित्र या कार्यक्रमास उपस्थित होते.   

            जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  विकास मीना म्हणाले की, जिल्ह्यामध्ये पाणीपुरवठा आणि स्वच्छतेचे काम ग्रामीण पातळीवर मोठ्या प्रमाणावर होत असून स्वच्छता दूत म्हणून स्वच्छता कर्मचाऱ्यांना सन्मान केला जात आहे. नागरिकांना स्वच्छतेची सवय लावण्यासाठी टप्पा दोन मध्ये जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतीने सक्रिय सहभाग घेऊन  सहभाग नोंदवला आहे. घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन,आदर्श ग्रामपंचायत, स्वच्छ आणि सुंदर ग्रामपंचायत मध्ये जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायती स्वयंस्फुर्त  सहभाग नोंदवत आहेत. लोकसहभागामुळे चांगले काम जिल्ह्यात होत असल्याचे सांगितले.                     

            या  शिबिरात तालुक्यातील सफाई मित्र कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली, मान्यवरांच्या हस्ते उपस्थित सफाई मित्र कर्मचाऱ्यांना स्वच्छता कीट, स्वच्छता ही सेवा या उपक्रमांतर्गत ‘एक पेड मा के नाम’ साठी रोपांचे वाटप करण्यात आले. तसेच केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यात आला. प्रास्ताविक जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक राजेंद्र देसले यांनी केले. जिल्ह्यातील पुरस्कार प्राप्त गांधेली ग्रामपंचायत,सावंगी, वडगाव कोल्हाटी, माळीवाडा, लाडगाव, गोलवाडी, जडगाव या ग्रामपंचायतींचे सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांना यावेळी  सन्मानित करण्यात आले.

०००००

 

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा