जवाहर नवोदय विद्यालयाच्या इयत्ता ९ वी व ११ वी प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन


छत्रपती संभाजीनगर, दि. ७ (जिमाका)- जवाहर नवोदय विद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२७-२८ साठी इयत्ता ९ वी व ११ वीच्या रिक्त जागांवरील प्रवेशासाठी ‘लॅटरल एन्ट्री सिलेक्शन टेस्ट-२०२७’ आयोजित करण्यात आली आहे. ही प्रवेश परीक्षा शनिवार, दि. १० एप्रिल २०२७ रोजी होणार असून पात्र विद्यार्थ्यांनी दि. ३० सप्टेंबर पर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

इयत्ता ९ वी प्रवेशासाठी पात्रता

इयत्ता ९ वीच्या प्रवेशासाठी विद्यार्थी संबंधित जिल्ह्याचा मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे. विद्यार्थी शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये मान्यताप्राप्त शाळेत इयत्ता ८ वीमध्ये शिकत असावा. विद्यार्थ्याचा रहिवासी जिल्हा आणि इयत्ता ८ वीचे अध्ययनाचे ठिकाण एकाच जिल्ह्यात असणे आवश्यक आहे. तसेच विद्यार्थ्याची जन्मतारीख दि. १ मे २०१२ ते दि. ३१ जुलै २०१४ या कालावधीतील असावी. दोन्ही तारखांचा यामध्ये समावेश आहे.

इयत्ता ९ वी प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज व अधिक माहितीसाठी https://cbseitms.nic.in/2026/nvsix_9 या संकेतस्थळाचा वापर करता येईल.

इयत्ता ११ वी प्रवेशासाठी पात्रता

इयत्ता ११ वीच्या प्रवेशासाठी विद्यार्थी संबंधित जिल्ह्याचा मूळ रहिवासी असावा. विद्यार्थी शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये मान्यताप्राप्त शाळेत इयत्ता १० वीमध्ये शिकत असणे आवश्यक आहे. इयत्ता १० वी यापूर्वीच उत्तीर्ण झालेले विद्यार्थी या प्रवेशासाठी पात्र राहणार नाहीत. विद्यार्थ्याचा रहिवासी जिल्हा आणि इयत्ता १० वीचे अध्ययनाचे ठिकाण एकाच जिल्ह्यात असावे. विद्यार्थ्याची जन्मतारीख दि. १ जून २०१० ते दि. ३१ जुलै २०१२ या कालावधीतील असावी. दोन्ही तारखांचा यामध्ये समावेश आहे.

इयत्ता ११ वी प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज व अधिक माहितीसाठी https://cbseitms.nic.in/2026/nvsxi_11 या संकेतस्थळाचा वापर करता येईल.

 

            जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र विद्यार्थ्यांनी या प्रवेश परीक्षेची संधी घेऊन विहित मुदतीत ऑनलाइन अर्ज सादर करावे, असे आवाहन जवाहर नवोदय विद्यालय प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा

संघ लोकसेवा आयोगामार्फत दि.14 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय संरक्षण व नौसेना अकादमी परीक्षा –II

कापूस, सोयाबीन, मका हमी भावाने विक्रीः ‘कपास किसान’ व ‘ई- समृद्धी’ॲपवर नोंदणीची सुविधा