पैठण तालुक्यात शासकीय वाळूडेपोतील वाळूसाठ्याचा ई-लिलाव

 


छत्रपती संभाजीनगर, दि. ७ (जिमाका)- पैठण तालुक्यातील मौजे ब्रम्हगाव (चतुर्थ फेरी) व मौजे हिरडपुरी (प्रथम फेरी) येथील शासकीय वाळू डेपोमधील शिल्लक वाळूसाठ्याची ई-निविदा व ई-ऑक्शन पद्धतीने लिलाव प्रक्रिया राबविण्यात येणार आहे, अशी माहिती तहसीलदार ज्योती पवार यांनी दिली आहे.

            लिलावासाठी ऑनलाइन नोंदणी दि. ८ ते २२ सप्टेंबर २०२६ या कालावधीत करता येईल.  ऑनलाइन ई-अक्शन प्रक्रिया दि. २९ सप्टेंबर रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत होणार आहे. लिलावाच्या सविस्तर अटी व शर्ती, हातची किंमत तसेच अन्य माहिती http://mahatenders.gov.in व https://chhatrapatisambhajinagar.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर तसेच उपविभागीय अधिकारी पैठण-फुलंब्री व तहसील कार्यालय, पैठण येथे उपलब्ध आहे,असेही कळविण्यात आले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा

संघ लोकसेवा आयोगामार्फत दि.14 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय संरक्षण व नौसेना अकादमी परीक्षा –II

कापूस, सोयाबीन, मका हमी भावाने विक्रीः ‘कपास किसान’ व ‘ई- समृद्धी’ॲपवर नोंदणीची सुविधा