सब पोस्ट ऑफिससाठी भाडेतत्त्वावर जागेची आवश्यकता;सोमवार (दि.७) पर्यंत प्रस्ताव मागविले

 

छत्रपती संभाजीनगर, दि. २ (जिमाका)- छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन सब पोस्ट ऑफिसच्या कामकाजासाठी रेल्वे स्टेशन परिसरात अंदाजे ३८७ चौरस फूट क्षेत्रफळाची सुस्थितीतील इमारतीची आवश्यकता आहे. त्यासाठी सुस्थितीतील इमारत  पाच वर्षांच्या कालावधीसाठी भाडेतत्त्वावर घेणे प्रस्तावित आहे. इच्छुक इमारत मालकांनी आवश्यक कागदपत्रांसह दि. ७ पर्यंत लेखी प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन वरिष्ठ डाक अधीक्षक, छत्रपती संभाजीनगर विभाग यांनी केले आहे.इमारतीत स्वतंत्र स्वच्छतागृह, स्वतंत्र वीज मीटर तसेच पोस्ट ऑफिसच्या कामकाजासाठी आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध असणे आवश्यक आहे.  इच्छुक इमारत मालकांनी प्रस्तावासोबत मालमत्ता पत्र अथवा ८-अ नमुना, मंजूर नकाशा, अद्ययावत मालमत्ता कर पावती तसेच अन्य संबंधित कागदपत्रे जोडावीत. संपूर्ण प्रस्ताव वरिष्ठ डाक अधीक्षक, छत्रपती संभाजीनगर विभाग, छत्रपती संभाजीनगर हेड पोस्ट ऑफिस बिल्डिंग, जुना बाजार, छत्रपती संभाजीनगर-४३१००१ या पत्त्यावर दि. ७ पर्यंत सादर करावा, असे डाक विभागाने कळविले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा

संघ लोकसेवा आयोगामार्फत दि.14 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय संरक्षण व नौसेना अकादमी परीक्षा –II

कापूस, सोयाबीन, मका हमी भावाने विक्रीः ‘कपास किसान’ व ‘ई- समृद्धी’ॲपवर नोंदणीची सुविधा