महाराष्ट्र राज्य सेवा हक्क अधिनियम 2015 समाज कल्याण विभागाची कार्यशाळा
औरंगाबाद, दि.30(जिमाका)- महाराष्ट्र
राज्य सेवा हक्क अधिनियम 2015 संदर्भात राज्य सेवा हक्क आयोग औरंगाबादचे
आयुक्त किरण जाधव यांच्या उपस्थितीत विभागातील समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक
आयुक्त, समाज कल्याण, जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, ५१ शासकीय
वसतिगृहांचे गृहपाल, ११ शासकीय निवासी शाळा मुख्याध्यापक, जिल्हा जात प्रमाणपत्र
पडताळणी समिती यांची व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे कार्यशाळा आज पार पडली.
प्रास्ताविक प्रादेशिक उपायुक्त श्रीमती जयश्री सोनकवडे यांनी केले.
जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीची माहिती उपायुक्त, जिल्हा जात
प्रमाणपत्र पडताळणी समिती एस.आर.दाणे, तसेच
अन्य अधिकाऱ्यांनीही माहिती दिली. आयुक्त
जाधव यांनी संपूर्ण औरंगाबाद विभागाचा सविस्तर आढावा घेतला तसेच कायदा सविस्तर
समजावून सांगितला. कार्यशाळेसाठी श्रीमती प्रणाली तायडे, कक्ष अधिकारी परदेशी, लेखाधिकारी चाटे,
डहाळे उपस्थित होते. आभार प्रदर्शन सहाय्यक संचालक, वित्त व लेखा निंबाळकर यांनी
केले.समन्वयन समाज कल्याण निरीक्षक मंगेश श्रीरामवार यांनी केले.
00000
Comments
Post a Comment