विशेष लेखः- पशुधनासाठी चारा उत्पादनात शेतकऱ्यांचा सहभाग
दुष्काळाची तीव्रता आता दिवसेंदिवस वाढेल असे अनुमान आहे. अर्थात या सगळ्याला एल निनो परिणाम हा घटक जबाबदार आहे. त्यामुळे शेती, पाणी, अन्न धान्य यासोबतच पशुधनासाठी चारा याचेही नियोजन करणे आवश्यक आहे. त्यासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रशासनाने चारा उत्पादनासाठी शेतकऱ्यांचा सहभाग घेऊन नियोजन केले आहे. जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर रब्बी हंगामात चारा उत्पादन कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेत महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या गंगापूर तालुक्यातील एकूण १ हजार २६२ एकर जमिनीवर चारा लागवडीसाठी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्यासाठी इच्छुक शेतकरी , शेतकरी उत्पादक कंपन्या , शेतकरी सहकारी संस्था यांच्याकडून इच्छापत्रे मागविण्यात आली आहेत. जिल्हाधिकारी कार्यालय , कृषी विभाग , पशुसंवर्धन विभाग आणि महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. या अंतर्गत अंदाजे तीन ते चार महिन्यांच्या कालावधीसाठी चारा पिकांची लागवड करण्यात येईल. गं...